शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

लाेकसभेसाठी विराेधकांनी उभे केले सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 05:36 IST

११ सदस्यांची समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. 

आदेश रावलबंगळुरू/नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ठोस आव्हान देण्याच्या प्रयत्नात २६ विरोधी पक्षांनी मंगळवारी त्यांच्या आघाडीचे नाव ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस’ (इंडिया) असे ठेवले. देशासमोर पर्यायी राजकीय, सामाजिक व आर्थिक अजेंडा मांडण्याचा संकल्प विरोधकांची बैठकीत व्यक्त केला. दोन दिवसीय बैठकीत विरोधी पक्षांनी युतीमध्ये एक समन्वयक आणि ११ सदस्यांची समन्वय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. 

राहुल गांधी यांनी सुचवले ‘इंडिया’ नाव n काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवावे, असे सुचवले. सर्वसंमतीने याला पाठिंबा देण्यात आला.n सर्वप्रथम दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या सूचनेची प्रशंसा करताना म्हटले की, यापेक्षा अधिक चांगले नाव असूच शकत नाही. आघाडीचे नाव इंडिया असे सुचवताना राहुल गांधी बैठकीत म्हणाले की, ही आघाडी देशासोबत आहे. n आपली लढाई कुणासाठी आहे? आक्रमण कोणावर होत आहे? हल्ला कोणावर होत आहे? देशाचे संविधान, लोक, संस्था, स्वातंत्र्य व लोकशाहीवर हल्ला होत आहे. ही लढाई ‘इंडिया’ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे.

विरोधकांची पुढील बैठक होणार मुंबईत

विरोधी आघाडीचा चेहरा कोण असेल, यासंदर्भात पत्रपरिषदेत मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या पुढील बैठकीत आघाडीचे निमंत्रक आणि समन्वय समितीचे सदस्य निश्चित केले जातील. सर्व नेते आणि समन्वय समितीच्या सदस्यांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जाईल. 

विरोधी ऐक्यासंदर्भात होणारी तिसरी बैठक मुंबईत घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. या बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली नसली तरी ती संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर म्हणजे १५ ऑगस्टनंतर होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस