शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi Case: ‘ज्ञानवापी परिसरातील ती वस्तू शिवलिंग नाही तर कारंजे, पण…’ काशीच्या महंतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 19:39 IST

Gyanvapi Case: सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

वाराणसी - सध्या वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीवरून सुरू असलेला वाद देशभरात चर्चिला जात आहे. दरम्यान, मशिदीमध्ये झालेल्या सर्व्हेनंतर एका पक्षाने मंदिर परिसरात शिवलिंग असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या पक्षाने ते पाण्याचे कारंजे असल्याचे म्हटले आहे. आता याबाबत केलेल्या सर्व्हेचा रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला असून, सर्वजण कोर्टाच्या नितालाची वाट पाहत आहे. दरम्यान, काशी विश्वनाथ मंदिराच्या मागे असलेल्या काशी करवत मंदिराचे महंत पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

पंडित गणेश शंकर उपाध्याय यांनी सांगितले की, ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग नाही आहे, तर ते पाण्याचे कारंजे आहे. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही ते पाहत आहोत. मात्र हे कारंजे सुरू असल्याचे आम्ही कधी पाहिले नाही. एका पक्षाचे लोक ते शिवलिंग असल्याचे सांगत आहेत. पाहण्यामध्ये ती वस्तू शिवलिंगासारखी दिसते. पण आमच्या माहितीनुसार ते कारंजे आहे. आम्ही लहानपणापासून ते पाहतोय.

आम्ही शेकडो वेळा त्या आकृतीजवळ गेलोय. अनेक तास राहिलोय. ज्ञानवापी परिसरातील मौलवी आणि सेवादारांशीही आमचं बोलणं व्हायचं. तेथील बांधकाम आधीपासून आहे. आम्ही त्यांना विचारायचो की मध्ये काय आहे, तर ते सांगायचे की ते कारंजे आहे. तसेच ते मुघलकालीन कारंजे आहे. मात्र आम्ही ते चालू असलेले कधी पाहिले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मीडियामध्ये जो व्हिडिओ आलाय त्यात काही सफाई कर्मचारी साफसफाई करताना दिसत आहेत. त्यात वरून फोटो घेण्यात आल्याने ती वस्तू शिवलिंगासारखी दिसत आहे. दरम्यान, तेथील नंदी मशिदीकडे का बघत आहे असं विचारलं असता गणेश शंकर उपाध्याय यांनी सांगितसे की, तिथे मंदिर होते, ही बाब कटू सत्य आहे. मुघलांनी ते मंदिर तोडले आणि तिथे मशीद बांधली. मात्र मागच्या बाजूला मंदिराचा काही भाग उरलेला आहे. 

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदVaranasiवाराणसीPoliticsराजकारण