शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

खासदाराने हातानेच स्वच्छ केले शौचालय! फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:36 IST

स्वतःच बादलीत पाणी घेतले आणि चक्क हाताने घासून टॉयलेट चकाचक केले. 

रिवा : मध्य प्रदेशच्या रिवा येथील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचा हाताने शौचालय साफ करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भाजप युवा मोर्चातर्फे आयाेजित वृक्षारोपण कार्यक्रमाला मिश्रा हे खटवारी भागातील शासकीय कन्या विद्यालयात पोहोचले. यावेळी शाळेचे शौचालय अस्वच्छ असल्याचे दिसले. त्यानंतर ब्रशची किंवा हाजमोज्यांची वाट न पाहता, केमिकल न वापरता त्यांनी स्वतःच बादलीत पाणी घेतले आणि चक्क हाताने घासून टॉयलेट चकाचक केले. 

ऑनर किलिंग; आई-वडिलांना फाशीबदाउ : मुलगी आणि जावयाच्या ऑनर किलिंगप्रकरणी मुलीचे आई-वडील आणि दाेन भावांना जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठाेठावली. आशा आणि तिचा पती गाेविंद यांची २०१७ मध्ये हत्या करण्यात आली हाेती. एका लग्नाच्या बहाण्याने दाेघांना गावी बाेलाविले हाेते. याप्रकरणी आशाचे वडील किशनपाल, आई जलधारा आणि भाऊ विजयपाल आणि रामवीर यांना न्यायालयाने दाेषी ठरविले.

नवव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यूनवी दिल्ली : बहुमजली इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडल्याने एका अभियंत्याचा मृत्यू झाला. ही आत्महत्या हाेती की ताे अपघाताने पडला, याचा तपास करण्यात येत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला ताे बंगळुरू येथून नाेयडा येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत रुजू झाला हाेता.भाजप आमदाराने दिला राजीनामाआगरतळा : त्रिपुरामधील भाजपचे आमदार बरबा माेहन त्रिपुरा यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गाेमती जिल्ह्यातील कारबुक येथून ते निवडून आले हाेते. ते टिपरा माेथा या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतरही भाजपकडे ३५ आमदारांसह स्पष्ट बहुमत आहे.

धान खरेदीसाठी शेतकरी आक्रमक

चंडीगड : धान खरेदी तत्काळ सुरू करावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हरयाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग राेखला. हरयाणामध्ये धानासह खरीप पिकांची खरेदी १ ऑक्टाेबरपासून सुरू हाेणार आहे. मात्र, ती तत्काळ सुरू करावी, अशी मागणी करण्यता आली. काही शेतकऱ्यांनी महामार्गावरील बॅरिकेड हटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला हाेता.लता मंगेशकर चौकाचे  मोदींच्या हस्ते लोकार्पणलखनौ : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीदिनी, २८ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल माध्यमातून अयोध्येतील लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यावेळी अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. सुमारे ७.९ कोटी रुपये खर्चून हा चौक तयार करण्यात आलेला आहे. चौकात उभारलेली माता शारदेची वीणा ही लता मंगेशकर चौकाची प्रमुख ओळख असणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMember of parliamentखासदार