शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

सिनेमातून कमाई झाली नाही, मग प्रोड्युसर बनला ड्रग्स स्मगलर, ३ वर्षांत कमावले २००० कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 10:25 AM

Crime News: चित्रपट निर्मितीमधून एका प्रोड्युसरला म्हणावी तशी कमाई झाली नाही, तेव्हा त्याने ड्रग्स स्मगलिंगचा धंदा सुरू केला. त्याने यासाठी तयार केलेल्या रॅकेटच्या माध्यमातून ३ वर्षांमध्ये तब्बल २००० कोटी रुपयांची तस्करी केली.

चित्रपट निर्मितीमधून एका प्रोड्युसरला म्हणावी तशी कमाई झाली नाही, तेव्हा त्याने ड्रग्स स्मगलिंगचा धंदा सुरू केला. त्याने यासाठी तयार केलेल्या रॅकेटच्या माध्यमातून ३ वर्षांमध्ये तब्बल २००० कोटी रुपयांची तस्करी केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय ड्रग्स स्मगलिंग नेटवर्क नष्ट करताना ही माहिती दिली. हा प्रोड्युसर आधी तामिळ चित्रपटांची निर्मिती करत असे. 

एनसीबीने दिल्लीमध्ये ३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ड्रग्स बनवण्यासाठी वापरण्यात येणारी ५० किलो ग्रॅम रसायने जप्त केली. ही रसायने मिक्स फूड पावडर आणि सुक्या नारळांमध्ये लपवून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पाठवण्यात येत नसत. 

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, केंद्रीय ड्रग्स नियंत्रण एजन्सी आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या संयुक्त पथकाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करून हे नेटवर्क उद्ध्वस्त केलं आहे. त्यांनी सांगितले की, भारतामधून सुक्या नारळांच्या पावडरमध्ये लपवून मोठ्या प्रमामावर स्यूडोइफेड्राइन पाठवण्यात येत असल्याची माहिती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील अधिकाऱ्यांनी चार महिन्यांपूर्वी दिली होती. 

ते पुढे म्हणाले की, एनसीबी आणि स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीची जुळवाजुळव केली, तसेच १५ फेब्रुवारी पश्चिम दिल्लीतील बसई दारापूर येतील एका गोदामवर धाड टाकली. त्यांनी सांगितले की, गोदामामधून १५ किमी स्युडोइफेड्राइन जप्त करण्यात आले. ते विविध धान्यांच्या फूड मिक्समध्ये लपवण्यात आले होते. या प्रकरणी तामिळनाडूमधील ३ जणांना पकडण्यात आले आहे. 

या ड्रग्स नेटवर्कच्या मास्टरमाईंडची ओळख एका तामिळ चित्रपट निर्मात्याच्या स्वरूपात पटवण्यात आली आहे, तो फरार आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्याला अटक झाल्यानंतर हे स्युडोइफेड्राइन कुठून आले, याचा शोध लावता येणार आहे. 

डीडीजी यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींनी एनसीबीला सांगितले की, मागच्या तीन वर्षांमध्ये त्यांच्याकडून स्युडोइफेड्राइनचा  स्टॉक एकूण ४५ वेळा पाठवण्यात आला. त्यामध्ये ३ हजार ५०० किलोहून अधिक स्युडोइफेड्राइनचा समावेश होता. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ हजार कोटी रुपये एवढी आहे. स्युडोइफेड्राइनचा वापर हा मेथामफेटामाइन बनवण्यासाठी केला जातो.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थSmugglingतस्करी