गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या अपमानावरून राज्यासह देशभरातील वातावरण तापलेलं असतानाच आता अखिल भारतीय इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोलंलं जातं तेवढं मोठं यश त्यांनी मिळवलेलं नाही, अशी मुक्ताफळे रशिदी यांनी उधळली आहेत.
एएनआयशी बोलताना अखिल भारतीय इमाम असोसिएशनचा अध्यक्ष असलेला मौलाना साजिद रशिदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या अनेक राजांना मारलं होतं, तसेच त्यांच्या राज्यावर कब्जा केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबाबत जेवढं बोललं जातं. तेवढं कुठलंही मोठं यश त्यांनी मिळवलेलं नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त उदगार काढणाऱ्या मौलाना साजिद रशिदी यांनी महाराणा सांगा यांच्या विषयीही वादरग्रस्त विधान केलं आहे. मुघल बादशाह बाबर याला महाराणा सांगा याने भारतात आणलं होतं. महाराणा सांगा याने अनेक अनेक राजपूत राजांना ठार मारलं होतं. असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, मौलाना रशिदी यांच्या आधी समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामजी लाल सुमन यांनीही असंच विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, भाजपाचे लोक मुस्लिमांमध्ये बाबराचा डीएनए आहे, असं म्हणत असतात. मात्र या बाबराला भारतात कुणी आलं होतं, हे जाणून घेण्यास मी इच्छूक आहे. इब्राहीम लोधीला पराभूत करण्यासाठी बाबराला राणा सांगा याने आणलं होतं. मुस्लिम जर बाबराचे वंशज असतील, तर तुम्ही त्या गद्दार राणा सांगाचे वंशज आहात, असं विधान रामजी लाल सुमन यांनी केलं होतं.