शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

"रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदी सरकारने तेव्हा घेतलेली भूमिका योग्य होती’’, शशी थरूर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:55 IST

Russia-Ukraine War: शशी थरूर यांनी रशिया आणि युक्रेनबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे सांगत तेव्हा मोदी सरकारने घेतलेली भूमिका योग्य होती, असं विधान केलं आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबलेलं नाही. हे युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्टीय पातळीवर अनेक स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही अद्याप या भागात शांतता प्रस्थापित झालेली नाही. दरम्यान, २०२२ साली जेव्हा या युद्धाला तोंड फुटलं होतं तेव्हा भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी सडकून टीका केली होती. मात्र आता शशी थरूर यांनी रशिया आणि युक्रेनबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे सांगत तेव्हा मोदी सरकारने घेतलेली भूमिका योग्य होती, असं विधान केलं आहे. तसेच आपण तेव्हा घेतलेल्या भूमिकेबाबत खेद वाटत आहे, असंही थरूर यांनी म्हटलं आहे.

त्याचं झालं असं की, २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धाला तोंड फुटल्यानंतर शशी थरून यांनी तेव्हा भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती. तेव्हा शशी थरूर संसदेमध्ये म्हणाले होते की, रशिया आपला मित्र आहे आणि त्यांचे सुरक्षेबाबतचे काही प्रश्न असतील. मात्र रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारतानं अचानक मौन बाळगणं युक्रेन आणि त्यांच्या समर्थकांसाठी निराशाजनक असेल. भारताने या मुद्द्यावर मौन बाळगणं हे दुर्दैवी आहे. 

दरम्यान, आता तीन वर्षांनंतर शशी थरूर यांनी तेव्हाच्या परिस्थितीबाबतचा आपला अंदाज चुकल्याचे आणि भारत सरकारने तेव्हा घेतलेली भूमिका योग्य होती हे कबूल केले आहे. ते म्हणाले की, आता तीन वर्षांनंतर मला माझ्या त्यावेळच्या  भूमिकेबाबत खूप खेद वाटत आहे. मी तेव्हा जी भूमिका घेतली होती ती योग्य नव्हती. फेब्रुवारी २०२२ मध्ये संसदेत झालेल्या चर्चेवेळी भारत सरकारच्या भूमिकेवर टीका करणारा मी एकमेव व्यक्ती होतो. रशियाने युक्रेनवर केलेलं आक्रमण हे संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याचं उल्लंघन असल्याचं मी म्हटलं होतं. सीमांची अखंडता आणि युक्रेनच्या सार्वभौमत्वाच्या तत्त्वाचं इथे उल्लंघन झालं असल्याचं मी म्हटलं होतं.  आंतरराष्ट्रीय वाद सोडवण्यासाठी बलप्रयोगाचा वापर आपण कायम अस्वीकारार्ह मानत आलो आहोत. या युद्धामध्ये या सर्व तत्त्वांचं उल्लंघन झालं असून, आणप त्याचा निषेध केला पाहिजे, अशी मागणी मी तेव्हा केली होती.

मात्र तीन वर्षांनंतर आता असं वाटतं की मीच चुकीचा होतो. आज भारताकडे वास्तवात असा पंतप्रधान आहे जो दोन आठवड्यांच्या फरकाने युक्रेनच्या राष्ट्रपतींची आणि रशियाच्या राष्ट्रपतींची गळाभेट घेऊ शकतो. या धोरणामुळे भारत कायमस्वरूपी शांततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतो. आपण युरोपमध्ये नाही ही सत्य परिस्थिती आहे. आपण युरोपमध्ये नाही आहोत. तसेच आपल्याला थेटपणे कसलाही धोका नाही आहे. खरंतर तेथील सीमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला काही फायदा होत नाही, असेही थरूर म्हणाले.  

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीयShashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारत