शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'मला ते बघवलं गेलं नाही आणि मी त्यांना पाणी दिलं, पण...'; चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या व्यक्तीने काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 12:51 IST

कुनो राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता, ज्यात एक व्यक्ती चित्त्यांना पाणी पाजताना दिसत आहे. त्याच व्यक्तीने यामागचा सगळा घटनाक्रम सांगितला आहे.

Kuno Cheetah:मध्य प्रदेशातील चित्त्यांना पाणी पाजण्याचं प्रकरण चांगलंच गाजलं. सावलीला बसलेल्या ज्वाला या मादी चित्त्यासह तिच्या बछड्यांना एका व्यक्तीने पाणी पाजलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्यक्तीला कामावरून काढून टाकलं, पण वन विभागाने पुन्हा काही तासांत त्याला परत कामावर घेतलं. चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या या व्यक्तीचे नाव सत्यनारायण गुर्जर आहे. त्याने सगळा घटनाक्रम एका माध्यमांशी बोलताना सांगितला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सत्यनारायण गुर्जर याची गाडी वन विभागाने भाडेतत्त्वाने घेतलेली आहे. त्यामुळे तो वन विभागाच्या पथकासोबतच श्योपूर येथील कुनो राष्ट्रीय उद्यानात गाडी चालक म्हणून काम करतो. 

...म्हणून मी चित्त्यांना पाणी पाजलं 

या घटनेबद्दल बोलताना सत्यनारायण गुर्जर म्हणाला, "जेव्हापासून चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात आले, तेव्हापासून मी त्यांच्याशी जोडलो गेलो आहे. माझी स्वतःची गाडी वन विभागाने गस्तीसाठी भाडेतत्त्वाने घेतली आहे. त्यादिवशी मी पथकासोबत होतो. चित्ते एका ठिकाणी बसलेले होते आणि ते तहानले असल्याचे दिसले. त्यामुळे मी परातीत पाणी ओतून त्यांना पाजलं."

सत्यनारायणने सांगितलं की, 'मला माहिती नव्हतं की, कुणीतरी पाठीमागून माझा व्हिडीओ बनवत आहे. जो नंतर व्हायरल झाला. त्यानंतर मला वन विभागाच्या संचालकांनी गाडीसह कामावरून काढून टाकले. पण, एका दिवसानंतर परत कामावर बोलवून घेतले. मी प्रशासनाचा आभारी आहे. माझी कोणतीही तक्रार नाही."

गावकऱ्यांनी केला सत्कार

"आमच्या कित्येक पिढ्या या जंगलात राहत आल्या आहेत. त्यामुळे मलाही जनावरांचा लळा आहे", असे सत्यनारायणने सांगितले. सत्यनारायण गुर्जरने चित्त्यांना पाणी पाजून चांगले काम केले. याबद्दल त्याचा ढेंगदा गावातील लोकांनी हार घालून आणि मिठाई खाऊ घालून सत्कार केला. 

गुर्जर समाजाचे गावातील प्रमुख शंकर गुर्जर म्हणाले की, 'सत्यनारायणने चित्त्यांना पाणी पाजून चांगले काम केले, हे आम्हा सगळ्यांचा मान वाढवणारी बाब आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश