शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:21 IST

भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान म्हणाले.

सिंगापूर : पाकिस्तानसोबतच्या संघर्षात भारतीय विमानांची हानी झाल्याचे भारतीय संरक्षण दलांचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी अप्रत्यक्ष मान्य केले. परंतु भारताची सहा लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. विमाने का पाडली गेली याची कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, जेणेकरून भारतीय लष्कराला आपल्या रणनीतीत सुधारणा करून पुन्हा प्रभावी प्रत्युत्तर देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

चौहान हे सिंगापूरमध्ये शांग्रीला संवाद परिषदेत सहभागी होण्यासाठी  गेले आहेत. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, माझ्या मते, विमान पाडण्यात आले हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या कारणांमुळे ते पाडले हे जाणून घेणे आवश्यक आहे. आम्ही आखलेल्या डावपेचांतील चुका आमच्या लक्षात आल्या. त्या आम्ही सुधारल्या आणि पुन्हा दोन दिवसांनी अमलात आणल्या. आम्ही पुन्हा हवाई हल्ले करून ठरविलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले. 

पाकिस्तानचा दावा काय?

७ मे रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संसदेत दावा केला की, भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही कारवाई केली, ज्यामध्ये ५ भारतीय लढाऊ विमाने पाडण्यात आली. पाच विमानांमध्ये ३ राफेल होते. नंतर, पाकने ६ भारतीय विमाने पाडल्याचा दावा करण्यास सुरुवात केली.

काय म्हणाले एअर मार्शल भारती?

भारतीय हवाई दलाच्या ऑपरेशन्स विभागाचे महासंचालक एअर मार्शल ए. के. भारती यांनी ११ मे रोजी पत्रकारांना सांगितले होते की, लढाईमध्ये हानी होतच असते. मात्र, ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेले भारतीय हवाई दलाचे सर्व वैमानिक सुरक्षित परत आले.

पाक चेकपोस्टवर तालिबानचा हल्ला

काबूल/इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान-सिंध प्रांतात स्वातंत्र्य लढा पेटत असताना अफगाणिस्तानशीही आता सीमावाद पेटला आहे. अफगाणच्या हेलमंद प्रांतात चगई जिल्ह्यालगत सीमेवर तालिबानने पाकिस्तानच्या अनेक लष्करी चौक्यांवर हल्ले केले. उखळी तोफांच्या माऱ्यात पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत.

बलुचिस्तान पेटले

बलुच लिबिरेशन आर्मीने (बीएलए) पाकिस्तानी लष्कराला चकवा देत सोराब शहरावर पूर्ण ताबा मिळवला असून या भागातील सर्व बँका, पोलिस ठाणी आणि सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवल्याचा दावा बीएलएचे प्रवक्ते जियांद बलूच यांनी माध्यमांना माहिती देताना केला.

जम्मू-काश्मीर, गुजरातसह ६ राज्यांमध्ये ब्लॅकआउट

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन शिल्ड’ अंतर्गत शनिवारी गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंडीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये दिवसा मॉक ड्रिल करण्यात आल्या. त्यानंतर रात्री ८ वाजता, या राज्यांमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. यावेळी संबंधित भागांत सायरनचे मोठ्याने आवाज ऐकू आले. त्यापूर्वी या राज्यांत संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत मॉक ड्रिलचा भाग म्हणून एअर स्ट्राइक ड्रिल आयोजित केली होती. जखमींना वाचवणे, वैद्यकीय मदत देणे, आग लागल्यास अग्निशमन दलाकडून त्वरित प्रतिसाद इत्यादी बाबींचा सराव करण्यात आला.

यापूर्वी ब्लॅकआउट कधी?

७ मे रोजी देशातील २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील २४४ शहरांमध्ये १२ मिनिटांचा ब्लॅकआउट सराव करण्यात आला. गृह मंत्रालयाने या शहरांना नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये समाविष्ट केले होते.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान