शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सहा दिवसांच्या बाळाचे यकृत 13 महिन्यांच्या बाळाला; दोघांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 11:19 IST

गेल्या आठवड्यात सुरत येथील डायमंड रुग्णालयात एका बाळाला (मुलगी) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी बाळ मेंदूमृत झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या आठवड्यात सुरत येथील अवघ्या सहा दिवसांच्या मेंदूमृत बाळामुळे दोघांचे प्राण वाचले, तर एकाला दृष्टी मिळाली. या बाळाच्या दोन किडन्या, यकृत आणि दोन डोळे दान करण्यात आले. बाळाचे यकृत विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स रुग्णालयातील १३ महिन्यांच्या बाळाला देण्यात आले असून, प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही करण्यात आली.  

गेल्या आठवड्यात सुरत येथील डायमंड रुग्णालयात एका बाळाला (मुलगी) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी बाळ मेंदूमृत झाले. त्यानंतर त्याच्या पालकांना समुपदेशकांनी अवयवदानाविषयी माहिती दिल्यानंतर पालकांनी अवयवदानास संमती दिली. 

डोळे आणि किडनी अहमदाबाद येथील रुग्णालयातील प्रतीक्षा यादीवरील रुग्णांना देण्यात आले, तर यकृत मुंबईतील नानावटी मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले.

रेल्वेने आणले यकृत     शनिवारी सकाळी पहाटे बाळाचे यकृत हवाईमार्गे मुंबईला आणणे शक्य नव्हते. त्यामुळे रविवारी पहाटे पाचच्या राजधानी एक्स्प्रेस पकडण्यात आली.     सकाळी ७.१५ वाजता बोरिवली येथे यकृत पोहोचले. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने विलेपार्ले येथील रुग्णालयात हा अवयव आणण्यात आला. रुग्णालयातील १३ महिन्यांच्या मुलावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाला दोन महिन्यांपासून यकृताचा आजार होता.

१० तास चालली शस्त्रक्रिया रुग्णाचे वय पाहता मायक्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरिता १० तास लागले. या मुलाची प्रकृती स्थिर असून, शस्त्रक्रिया चांगली झाली असल्याचे लिव्हर, इन्टेस्टाईन आणि पॅनक्रिया ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. अनुराग श्रीमल यांनी सांगितले.

टॅग्स :Organ donationअवयव दान