शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मिनिस्टर इन वेटिंगची यादी संपता संपेना; मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 08:13 IST

१७ जानेवारीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांतून भाजपमध्ये सहभागी झालेले नेते व सहयोगी दलांचे नेत्यांमध्येही उत्सुकता आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक व दहा राज्यांतील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन होणाऱ्या मोदी सरकारच्या अंतिम फेरबदलात मंत्री होण्यासाठी मिनिस्टर इन वेटिंगची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नेत्यांच्या कामकाजावर पूर्णपणे राजकारणाची मजबुरी स्पष्टपणे दिसत आहे.

१७ जानेवारीनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत भाजप नेत्यांबरोबरच इतर पक्षांतून भाजपमध्ये सहभागी झालेले नेते व सहयोगी दलांचे नेत्यांमध्येही उत्सुकता आहे. हा फेरबदल २०२४ पूर्वी होणारा अंतिम फेरबदल मानला जात आहे.  भाजपच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या नेत्याला सध्या मोदी मंत्रिमंडळापासून भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नव्या टीममध्ये सहभागी होण्याची आशा आहे. ज्या राज्यांत निवडणुका होणार आहेत, त्या नागालँड, मेघालय, त्रिपुरा, कर्नाटक, मिझोराम, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानच्या नेत्यांनाही याबाबत शक्यता दिसते.

ते फक्त मोदींनाच माहिती

कोण मंत्री होणार, कोण नाही होणार आणि मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, हे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच माहिती आहे. परंतु संभाव्य मंत्र्यांच्या प्रदेशवार नेत्यांच्या नावांवर भाजपमध्ये विचारविनिमय सुरू झाला आहे. १७ जानेवारीला दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सर्व प्रदेशाध्यक्ष व संघटन महामंत्र्यांची दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याबरोबर स्वतंत्र बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यांकडूनही राजकीय कारणांसाठी पक्षासाठी गरजेच्या असलेल्या संभाव्य नेत्यांची नावे मागितली जातील.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार