शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...थंडीने तलाव, जलवाहिन्या गोठल्या! काश्मीरमध्ये तापमान उणे ७ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 09:36 IST

श्रीनगर शहरात सलग दुसऱ्या रात्री उणे ४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्यामुळे दल सरोवराच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर तयार झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : काश्मीरमधील तीव्र कोरड्या आणि थंडीच्या लाटेपासून बुधवारी कोणताही दिलासा मिळाला नाही. मंगळवारी रात्री अनंतनाग हे जम्मू आणि काश्मीरमधील सर्वांत थंड ठिकाण ठरले, कारण पारा गोठणबिंदूपेक्षा सात अंशांपेक्षा खाली गेला होता.श्रीनगर शहरात सलग दुसऱ्या रात्री उणे ४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवल्यामुळे दल सरोवराच्या पृष्ठभागावर बर्फाचा पातळ थर तयार झाला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हाऊसबोटमध्ये राहणाऱ्या तलावातील रहिवाशांना त्यांच्या बोटी किनाऱ्याकडे वळवताना बर्फाचा थर बाजूला सारताना दमछाक करावी लागली. काश्मीरमधील अनेक भागांत थंडीच्या लाटेमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्याही गोठल्या आहेत. गुलमर्गमध्ये -३.८ अंश, काझीगुंडमध्ये -४.६, कोकेरनागमध्ये उणे ३.२ तापमान नोंदवले गेले.

कुठे थंडी, कुठे पाऊस तर कुठे गारा- मध्य प्रदेश आणि राजस्थानसह उत्तर भारतातील १२ राज्यांमध्ये बुधवारी (३ जानेवारी) दिवसाची सुरुवात दाट धुक्याने झाली. - धुक्यासोबतच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही जोरदार पाऊस झाला. इंदूर, भोपाळ, वाराणसी, लखनौसह १५ शहरांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्येही गारा पडल्या. 

पावसाची शक्यता कुठे?अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे लक्षद्वीप, तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. त्याचवेळी राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरWaterपाणी