शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा, गुजरात, कर्नाटकनंतर यूपीतही 'द काश्मीर फाइल्स' टॅक्स फ्री! योगी आदित्यनाथ यांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 23:16 IST

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेश राज्याचीही भर पडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.

'द काश्मीर फाइल्स' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेश राज्याचीही भर पडली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. यापूर्वी हा चित्रपट हरियाणा, गुजरात आणि कर्नाटकमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यावर चित्रपटगृहातून भावूक होऊनच प्रेक्षक बाहेर पडत आहेत. या चित्रपटात 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. हा चित्रपट बनवल्याबद्दल विवेक अग्निहोत्रीचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर आणण्याची तयारी सुरू आहे.

चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार आणि पल्लवी जोशी हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याआधीही विवेक अग्निहोत्रीने जेव्हा 'द ताश्कंद फाइल्स' चित्रपट आणला होता तेव्हा लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले होते. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. आता या चित्रपटाला ज्या प्रकारचा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, तो पाहता चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचं दिसत आहे. 

बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची दमदार कामगिरीविवेक अग्निहोत्री यांनी नुकतीच दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांना हा चित्रपट बनवण्यासाठी किती वेळ लागला आणि किती मेहनत घेतली हे सांगितले. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चित्रपटाने 3 दिवसांत एकूण 27.15 कोटींची कमाई केली आहे. ही अतिशय चांगली सुरुवात मानली जात आहे. चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा पार करेल. सध्या चित्रपट पाहण्यासाठी तिकीटच मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

टॅग्स :bollywoodबॉलिवूडyogi adityanathयोगी आदित्यनाथ