शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक युद्धात मदतीला धावलेल्या वीरांगना आता लढतात मतदानासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 07:17 IST

पेटविली ‘राष्ट्र जागर’ची मशाल! प्रत्येक वेळी न चुकता करतात मतदान

रमाकांत पाटीललोकमत न्यूज नेटवरमाधापूर (भूज) : १९७१ मधील भारत- पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैन्याने उद्ध्वस्त केलेली भूज विमानतळाची धावपट्टी दुरुस्तीसाठी भारतीय सेनेच्या मदतीसाठी धावून आलेल्या वीरांगना आज राष्ट्र जागरसाठी पुढे आल्या आहेत. मतदान हे देखील राष्ट्रीय कार्य असून प्रत्येकाने आपले कर्तव्य बजवावे, असे आवाहन त्या सर्वांना   करीत आहेत. माधापूर गाव अलीकडेच आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत गाव म्हणून चर्चेत आले. याच गावातील जवळपास ३०० महिला १९७१च्या पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात जीवाची पर्वा न करता भारतीय सैन्याच्या मदतीसाठी धावल्या होत्या. 

जीवाची पर्वा न करता केली धावपट्टी दुरुस्तपाकिस्तानने भूज विमानतळाची धावपट्टी उद्ध्वस्त केली होती. भारतीय सैन्यदलाचे तेव्हाचे प्रमुख पी.सी. लाल यांनी माधापूर येथील तत्कालीन सरपंचांना विनंती करून धावपट्टी दुरुस्तीसाठी कामगार देण्याची मागणी केली होती. तेव्हा ३०० महिला धावपट्टी दुरुस्तीसाठी पुढे आल्या. बॉम्बगोळ्यांचा वर्षाव सुरू असताना जीवाची पर्वा न करता अवघ्या साडेतीन दिवसांत महिलांनी धावपट्टी दुरुस्त केली हाेती. 

या महिलांच्या शौर्याचे तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, स्व. अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले होते. त्यांच्या गावाच्या प्रवेशद्वारावरच वीरांगना  स्मारक उभारलेले आहे.  

कणाकणात राष्ट्रभक्तीnआज काही वीरांगना  हयात आहेत. त्यातील वालाबेन जेठालाल सिंघानी म्हणतात, आमच्या कणाकणात राष्ट्रभक्तीची भावना आहे. nराष्ट्रप्रेमी व योग्य उमेदवारालाच मतदान करावे. अशाच भावना देबाई दबासिया, लीलबाई भुऱ्या यांनीही व्यक्त केल्या.nसामबेन भंडेली यांनी सांगितले, आम्ही कुठल्या पक्षाचे काम करीत नाही. मात्र, प्रचारासाठी मोठे नेते येतात तेव्हा आम्ही त्यांना देशाची सेवा करा, राष्ट्रभक्ती जिवंत असू द्या. 

टॅग्स :VotingमतदानGujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022