शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नवरदेवानं ११.५१ लाख रुपये केले परत, फक्त १ रुपया अन् श्रीफळ घेत लग्न केलं, वधू पित्याच्या डोळ्यात अश्रू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 10:17 IST

राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले

पाली-

राजस्थानातील नागौर जिल्ह्यात हुडील गावात एका लग्न सोहळ्यात अनोखा प्रकार पाहायला मिळाला. नवरदेवानं 'तिलक' विधीमध्ये मिळालेले ११ लाख ५१ हजार रुपये परत केले आणि हे पाहून वधूच्या पित्याचे डोळे पाणावले. नवरदेवानं शगुन म्हणून फक्त १ रुपया आणि श्रीफळ घेत लग्न मंडपात विवाहसाठी उभा राहिला आहे. ही घटना पाहून गावातील सर्वच चक्रावले आणि या लग्नाची चर्चा फक्त त्याच गावात नव्हे, तर जवळपासच्या सर्व गावात चर्चेचा विषय ठरत आहे. 

जैतारण तहसीलमध्ये सांगावास तंवरोमधील ढाणी निवासी अमर सिंह तंवर यांचं लग्न २२ फेब्रुवारी रोजी नागौर जिल्ह्यातील हुडील गावातील रहिवासी प्रेम सिंह शेखावत यांची कन्या बबिता कंवर हिच्याशी झालं. लग्न सोहळ्यात मंडपात सर्व विधी होत असताना अमर सिंह यांनी वधूच्या वडिलांना सांगितलं की ते कोणत्याही प्रकारचा हुंडा घेणार नाहीत. राजपूत समाजातील लोकांसह सर्वांनी अमर सिंग तंवर यांच्या या पुढाकाराचं कौतुक केलं. 

अमर सिंह तंवर यांची वरात हुडिला जिल्ह्यातील नागौरी येथे आली होती. त्यावेळी सर्व विधी पार पाडले गेले. यातील तिलक विधीमध्ये नवरदेवाला ११ लाख ५१ हजार रुपये भेट म्हणून दिले गेले. पण तंवर यांनी राजपूत समाजाला संदेश देण्याच्या उद्देशानं तिलक विधीत मिळालेली सर्व रक्कम वधूच्या वडिलांना परत दिली. 

तीन पीढ्यांपासून करताहेत देशसेवाअमर सिंह तंवर हे लष्करात सैनिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे वडील भंवर सिंह देखील लष्करात होते. अमर सिंह यांची पोस्टिंग सध्या उत्तराखंडमधील देहरादून येथे आहे. तंवर यांच्या तीन पीढ्या देशसेवा करत आहेत. अमर सिंह यांचे वडील भंवर सिंह लष्करात सुभेदार मेजर होते आणि आजोबा बहादुर सिंह यांनी १९७१ साली भारत-पाक युद्ध, १९६५ साली भारत-चीन युद्धात देशाची सेवा केली होती. 

तिलकची प्रथा बंद करण्याचं केलं आवाहनतंवर यांनी राजपूत समाज आणि इतर समस्त समाजांना तिलक प्रथेमध्ये नवरदेवाला दिल्या जाणाऱ्या पैशांची प्रथा बंद करावी असं आवाहन केलं आहे. यामुळे गरीब कुटुंबावर खूप दडपण येतं असंही ते म्हणाले. प्रेम सिंग शेखावत यांची कन्या बबीता हिच्या लग्नात जेव्हा तिलक विधीवेळी नवरदेव अमर सिंह यांनी पैसे परत केले तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसंच लग्नाला उपस्थित वऱ्हाडी मंडळींनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत केलं.