शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी बिहारमध्ये भरतो नवरदेवांचा बाजार; नेपाळमधूनही येतात इच्छुक; पात्रतेनुसार ठरतो सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:26 IST

या बाजाराला दूरवर्ती भागासह शेजारच्या नेपाळहून  वर-वधू शेकडोंनी येतात.  ३० जूनपासून भरणाऱ्या या बाजारासाठी नवरदेव पोहोचत आहेत. विशेष म्हणजे येथे येणारे नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगडी परिधान करुन येतात.

विभाष झा -

पाटणा : बाजार ही संकल्पना सर्वश्रुत आहे.  आठवडी बाजार, कापड बाजार, सराफा बाजार आदी बाजाराचे प्रकार आहेत. अलीकडचे मॉलही याच प्रकारात येतात. तुम्ही म्हणाल, यात काय नवीन? परंतु, बिहारच्या  मिथिलांचल भागातील मधुबनी जिल्ह्यातील सौराठ सभागाछी या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरात भरतो ; तो यापेक्षा वेगळा असून येथे दरवर्षी नवरदेवांचा बाजार भरतो.

 या बाजाराला दूरवर्ती भागासह शेजारच्या नेपाळहून  वर-वधू शेकडोंनी येतात.  ३० जूनपासून भरणाऱ्या या बाजारासाठी नवरदेव पोहोचत आहेत. विशेष म्हणजे येथे येणारे नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगडी परिधान करुन येतात. वधू पक्षाकडचे लोक नवरदेव पसंत करतात. सर्व काही मनजोगते असले, तर सुरु होते बोलाचाली. सोयरसंबंध  निश्चित झाल्यानंतर निबंधक (नोंदणीकार) सहमती दस्तावेज लिहून घेतात. नोंदणीकार यासाठी  कोणताही मोबदला घेत नाहीत; काही मोबदला देणे,  हे  वर-वधू पक्षाकडील मंडळीच्या स्वेच्छेवर असते.  त्यानंतर ठरते लग्नाची तारीख. 

येथे येणाऱ्या लोकांची राहण्याची व्यवस्था धर्मशाळेत असते. अनेक लोक हॉटेलात,  काही नातेवाईकांकडे राहतात. येथे मैथिल ब्राह्मण समुदायाशी संबंधित लोकांची गर्दी असते.  वर-वधुचे  कूळ , गोत्र, कुंडली आणि  राशीही पाहिली जाते. कोरोनाकाळात ही परंपरा बंद होती; परंतु, मागच्या वर्षी १० हजार लोक आले होते आणि ४५० वैवाहिक संबंध जुळले होते. सभागाछीमध्ये विवाह नोंदणी होते. या परंपरेची लोकप्रियता आजच्या काळातही प्रासंगिक आहे.

एक लाख रुपये होतो खर्च...सौराठ सभा समितीचे सचिव डॉ. शेखरचंद्र झा यांनी सांगितले की, वर-वधू परिचय मेळावा आयोजनाचा खर्च समिती करते. समितीचे सदस्य आपसात वर्गणी गोळा करतात. इतर संघटनाही मदत करतात. यासाठी जवळपास एक लाख रुपयांचा खर्च येतो.

 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नMarketबाजार