शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचा उद्धार हाच सरकारचा उद्देश, एक लाख लाभार्थ्यांना ५४० कोटींचा हप्ता - पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 08:08 IST

आपल्या सरकारची मागील १० वर्षे गरिबांसाठी समर्पित आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान ’ (पीएम-जनमन) अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या एक लाख आदिवासी लाभार्थ्यांना ५४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी जारी केला. आपल्या सरकारची मागील १० वर्षे गरिबांसाठी समर्पित आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

विविध कल्याणकारी योजना सर्वांपर्यंत पोहोचल्या तरच देशाचा विकास होऊ शकतो आणि प्रत्येकाला अगदी दुर्गम भागातील लोकांनाही त्याचा फायदा होईल याची गॅरंटी आपण देतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, आपण अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभापर्यंत विशेष धार्मिक अनुष्ठान सुरू केले असताना शबरी यांची आठवण होणे स्वाभाविक आहे. 

राष्ट्रपती मुर्मू यांना श्रेयमोदींनी पंतप्रधान-जनमन योजनेसाठी भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मार्गदर्शनाचे श्रेय दिले आणि सांगितले की, त्याच पार्श्वभूमीतून आलेली व्यक्ती म्हणून त्यांनी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल अनेकदा सांगितले.

शिष्यवृत्तीत केली अडीचपट वाढअनुसूचित जमातींसाठीच्या अनेक कल्याणकारी योजनांचा निधी पाच पटीने वाढला असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत गेल्या दहा वर्षांत अडीच पट वाढ झाली आहे, आणखी ५०० पेक्षा जास्त एकलव्य मॉडेल शाळांचे बांधकाम सुरू आहे. पूर्वी अशा फक्त ९० शाळा अस्तित्वात होत्य, असे पंतप्रधान म्हणाले.

चार कोटींहून अधिक घरेत्रेतायुगातील राजा रामाची गोष्ट असो किंवा सद्यस्थिती असो, गरीब, वंचित आणि आदिवासींच्या उन्नतीशिवाय सर्वांचे कल्याण शक्य नाही. गेल्या १० वर्षांत गरिबांसाठी चार कोटींहून अधिक कायमस्वरूपी घरे बांधण्यात आली आहेत. आम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचलो आहोत ज्यांची यापूर्वी कधीही काळजी घेतली गेली नव्हती, असेही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी