शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या नावाचा कायदा सरकारला नको!, नव्या कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेसची ‘मनरेगा बचाओ संग्राम यात्रा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:22 IST

MGNREGA Bachao Sangram Yatra: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या (मनरेगा) जागी नवीन कायदा आणण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेसने शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. केंद्र सरकारला महात्मा गांधी यांच्या नावाशी संबंधित कोणताही कायदा नको असल्याचा आरोप यावेळी पक्षनेत्यांनी केला. 

नवी दिल्ली -  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या (मनरेगा) जागी नवीन कायदा आणण्याच्या सरकारच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेसने शुक्रवारी निषेध मोर्चा काढला. केंद्र सरकारला महात्मा गांधी यांच्या नावाशी संबंधित कोणताही कायदा नको असल्याचा आरोप यावेळी पक्षनेत्यांनी केला. 

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसचे जुने मुख्यालय असलेल्या २४-अकबर रोड ते गांधी स्मृती स्थळापर्यंत मोर्चाच्या स्वरूपात ‘मनरेगा बचाओ संग्राम यात्रे’चे आयोजन केले होते. परंतु, काही अंतरावर पोलिसांनी हा मोर्चा अडवला. संसदेच्या गेल्या अधिवेशनात मनरेगाच्या जागी ‘विकसित भारत-जी राम जी विधेयक’ मंजूर करण्यात आले. त्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. 

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, कोषाध्यक्ष अजय माकन, काँग्रेसचे दिल्ली प्रभारी काझी मोहम्मद निजामुद्दीन, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष देवेंद्र यादव आणि इतर अनेक नेते-कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होते.

ऐतिहासिक कायदा सर्वानुमते संसदेत संमत‘मनरेगा’चे समर्थन करताना जयराम रमेश म्हणाले, हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी कायदा सप्टेंबर-२००५ मध्ये सर्वानुमते पारित करण्यात आला होता. या कायद्याच्या निर्मितीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे मोलाचे योगदान होते. 

गरिबांची क्रूर चेष्टा केलीया मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेस नेत्यांनी दावा केला की, मनरेगाच्या रूपाने काँग्रेस सरकारच्या काळात गरिबांना सन्मानाने जीवन जगण्याचा, त्यांच्या गावात राहून काम करण्याचा अधिकार मिळाला. यातून गावांचा सर्वांगीण विकास झाला. मात्र विद्यमान सरकारने बुलडोझर वापरून हा कायदा रद्द केला आणि गरीबांची पुन्हा क्रूर चेष्टा केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress protests new law replacing Mahatma Gandhi's MNREGA scheme.

Web Summary : Congress protested a new law replacing MNREGA, alleging the government dislikes Gandhi's name. They organized a march which was stopped by police, criticizing the new legislation as anti-poor.
टॅग्स :Parliamentसंसदcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार