शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

संसदेत छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवगाथा; अनेक पराक्रमी राजा-महाराजांची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 10:19 IST

रामराज्यापासून सम्राट अशोकापर्यंत तसेच मगध साम्राज्यातील कौटिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या धोरणाचा संपूर्ण संग्रहालयात उल्लेख करण्यात आला आहे

संजय शर्मानवी दिल्ली : नवीन संसदेच्या वस्तुसंग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांपासून सम्राट अशोक, कौटिल्य व मगध साम्राज्यापर्यंत भारतातील अनेक महान राज्यकर्त्यांचे चित्रण करण्यात आले आहे. ज्यांच्या राज्य कारभाराचा प्रभाव शतकानुशतके जनमानसावर कायम आहे, अशा थोर राज्यकर्त्यांचे म्युरल्स या संग्रहालयात चितारण्यात आले आहेत. 

रामराज्यापासून सम्राट अशोकापर्यंत तसेच मगध साम्राज्यातील कौटिल्याचा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या धोरणाचा संपूर्ण संग्रहालयात उल्लेख करण्यात आला आहे. संविधान सभेत कशा प्रकारे भारताच्या राज्यघटनेला अंतिम स्वरूप  देण्यात आले, याचेही चित्रण करण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रतही नवीन संसदेत प्रतिष्ठापित करण्यात आली  आहे. 

पंतप्रधानांसाठी गजद्वार, मंत्र्यांसाठी मकरद्वारजुन्या संसदेत प्रवेशद्वार क्रमांक पाच पंतप्रधानांसाठी, प्रवेशद्वार क्रमांक चार मंत्र्यांसाठी, प्रवेशद्वार क्रमांक तीन सभापतींसाठी आणि प्रवेशद्वार क्रमांक १३ उपराष्ट्रपतींसाठी राखीव होते. प्रवेशद्वार क्रमांक एक, दोन आणि बारामधून सर्व खासदार आणि मंत्री प्रवेश करत असत. तथापि, नव्या संसदेत पंतप्रधान ज्या प्रवेशद्वारातून संसद भवनात प्रवेश करतील त्या प्रवेशद्वाराला गजद्वार असे नाव देण्यात आले आहे, केंद्रीय मंत्र्यांसाठी मकरद्वार व पत्रकारांना गरुडद्वार आणि हंसद्वार प्रवेशद्वारांद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.

कॉफी रुम असेलनव्या संसदेत मध्यवर्ती सभागृह (सेंट्रल हॉल) नाही; पण दोन ठिकाणी २० ते ३० खासदार बसू शकतील, अशा कॉफी रुम बनवण्यात आल्या आहेत. खासदारांसाठी दोन छोट्या कॅन्टीन बनवण्यात आल्या आहेत. तेथे खासदारांना जेवण तसेच नाष्टा घेता येईल.

नवीन संसद तुलनेने लहान जुन्या संसदेच्या तुलनेत नव्या संसदेचे क्षेत्रफळ खूपच कमी आहे, त्यामुळे केवळ काही केंद्रीय मंत्र्यांना तळमजल्यावर कार्यालये मिळू शकली आहेत, तर उर्वरित केंद्रीय मंत्री आणि राजकीय पक्षांना पहिल्या मजल्यावर आणि दुसऱ्या मजल्यावर कार्यालये देण्यात आली आहेत

टॅग्स :Parliamentसंसद