शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 05:33 IST

पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ल्यासह इतर मुद्यांवर विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला.

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी पहलगाम हल्ल्यासह इतर मुद्यांवर विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करावे लागले. नंतरही गोंधळ सुरूच राहिल्याने दिवसभरासाठी हे कामकाज तहकूब करण्यात आले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांनी पहलगाम हल्ल्याचा तसेच बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या सुरू असलेल्या पुनरावलोकनाचा मुद्दा उपस्थित करीत चर्चेची मागणी लावून धरली. यामुळे एकच गोंधळ उडाला. कामकाज सुरू झाल्यानंतर २० मिनिटांतच गोंधळामुळे दुपारी १२ पर्यंत ते तहकूब करण्यात आले. दुपारी ४ वाजता कामकाज पुन्हा सुरू झाले. परंतु, लगेच विरोधक आक्रमक झाले आणि गोंधळ सुरू झाला.पंतप्रधानांची मंत्र्यांसोबत बैठकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संसदेत मंत्रिमंडळातील सदस्यांसोबतच विविध मुद्यांवर चर्चा केली. या बैठकीबाबत सरकार किंवा सत्ताधारी पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले गेले नाही. परंतु, संसदेचे कामकाज सुरळीत चालविण्यासोबतच विरोधकांची आक्रमकता कशी कमी करायची यावर चर्चा झाली असल्याचे समजते.  पंतप्रधान तीन देशांच्या दौऱ्याहून मायदेशी परतल्यानंतर पहलगाम हल्ल्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे. 

हे अधिवेशन म्हणजे विजयोत्सव : मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना नमूद केले की, ‘हे अधिवेशन म्हणजे एक विजयोत्सव आहे.’ ही भावना सर्व संसद सदस्य मांडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मोदी यांनी सरकारच्या अनेक बाबींवर भाष्य केले. ‘बॉम्ब आणि बंदुकांवर संविधानाचा विजय होत आहे’, असे ते म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने आपले लक्ष्य शंभर टक्के गाठल्याचेही सांगून संपूर्ण जगाला यातून आपले सामर्थ्य दिसले, असे ते म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेसाठी सरकारची तयारीलोकसभेत विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद देत सरकारने पहलगाम हल्ला व ‘ऑपरेशन सिंदूर’वर १६ तासांच्या चर्चेस तयारी दर्शवली. ही चर्चा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात विदेश दौऱ्यावर जात असून ते सभागृहात उपस्थित राहावयाचे असतील तर ही चर्चा पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी विरोधकांची मागणी आहे.

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनdelhiदिल्लीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला