शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

निवडणूक आयोगानं आपली प्रतिमा जपायला हवी; माजी निवडणूक आयुक्त कुरैशी यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 22:42 IST

माजी निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केलं मत.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या असताना विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी मुख्य निवडणूक आयुक्त (Former CEC) एस. व्हाय. कुरैशी यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. "निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा जपली पाहिजे. जनता सर्व काही पाहते. चांगली प्रतिमा असती तर फायदा होतो. लोकांनी बोट दाखवलं नसतं, लोकांनी समजून घेतले असते. चांगली प्रतिमा फायद्याची असते," असे ते म्हणाले.

काही पक्षांनाच निवडणूक आयोगाची नोटीस मिळाली, या विरोधकांच्या आरोपाबाबत कुरैशी यांना सवाल करण्यात आला. "मी या गोष्टीचा अभ्यास केलेला नाही, पण नोटीस कुणाला मिळाली, कुणाला गेली नाही, हे सर्वांना माहीत आहे. एकमेकांविरोधात तक्रारी वाढवून सांगितल्या जातात. निवडणूक आयोग हे सर्व पाहतो. याबाबत चर्चा होते," असेही ते म्हणाले. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये नोंदणीकृत पक्षाला मान्यता देण्यासंदर्भातील आरोपाला उत्तर देताना ते म्हणाले, "मला त्याची पार्श्वभूमी माहित नाही. ३ दिवसांची नोटीस बदलून ७ दिवस करण्यात आली. निवडणुकीच्या आधी लोकांना आरोपांची संधी मिळते. हाच प्रकार ६ महिन्यांपूर्वी घडला असता तर काहीही झाले नसते," असेही त्यांनी स्पष्ट केले.

"निवडणूक आयोगाचे निरीक्षक असतात. स्थानिक एसपी, डीएम यांचा अहवालही घेतला जातो. निवडणूक आयोग अहवालानुसार निर्णय घेतात. पुरावे तर हवेच असतात. कुणी जर हवेत तक्रार केली तर त्याचे काही होत नाही. पुरावे असतील त्याकडे पाहिले जाते, वस्तुस्थिती पाहून निर्णय घेतला जातो. याशिवाय गरज भासल्यास फील्डवरून अहवाल मागवला जातो, डीएमची आवृत्ती मागवली जाते," असेही ते म्हणाले.

खर्चाची मर्यादा सर्वांसाठी सारखीचपक्षाच्या प्रचारावरील खर्चाच्या प्रश्नावर कुरेशी म्हणाले, 'व्हर्च्युअल रॅलीची साधने नाहीत, तर सामान्य रॅलीची साधने आवश्यक असतात. गर्दीवर लाखोंचा खर्च होतो आणि तेदेखील करत असतील तर त्याचं काही उत्तर नाही. मर्यादा सर्वांसाठी समानच आहे," असे कुरैशी म्हणाले. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी पहिलेच केली जात होती, मात्र काही वर्षांपूर्वी त्यात बदल करण्यात आला. मार्जिन लीड जर कमी आहे आणि मते अधिक असतील तर ती फसवणूक आहे. त्यानंतर वाद सुरू होतात. ही प्रकरणे सुरुवातीलाच घ्यावीत, त्यामुळे ही शंका दूर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगIndiaभारत