शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटावर ठपका, ७८ पानांच्या निकालात आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 07:02 IST

निवडणूक आयोगाचा निर्णय; धनुष्यबाणही शिंदेना, उद्धव ठाकरेंना धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पक्षाचे नाव आणि चिन्ह यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शुक्रवारी झाला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला. यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा पक्ष व त्यांचे ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष व त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह यांची मुदत केवळ चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे. 

पक्षाच्या संघटनात्मक बाजूंवर कुणाचे वर्चस्व आहे, हे तपासणे कठीण आहे. हे निश्चित निर्णय घेण्याइतपत स्पष्ट नसल्याचे आयोगाने सांगितले.राज्यघटनेच्या ३२४ नुसार मिळालेल्या अधिकारानुसार व निवडणूक चिन्ह वाटप कायदा १९६८ च्या कलम १५ व १८ नुसार पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह हे अर्जदार एकनाथ शिंदे यांना देत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

एका व्यक्तीचा अधिकार : शिवसेनेच्या घटनेनुसार संघटनात्मक नियुक्त्यांचे सारे अधिकार एका व्यक्तीला आहेत. हे लोकशाही तत्त्वांच्या विरोधात आहे. शिवसेनेची सर्वोच्च निर्णय संस्था राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. प्रतिनिधी सभेचे सदस्य राष्ट्रीय कार्यकारिणी निवडतात. प्रतिनिधी सभेच्या सदस्यांबाबत तपशील दिलेला नाही. 

आयोगाचा या मुद्द्यावर ठपका

७८ पानांच्या निकालात निवडणूक आयोगाने जवळपास सर्व बाजूंनी  आढावा घेतला आहे.

ध्येय व उद्दिष्टापासून दूर पक्षाच्या मूळ तत्त्वाला उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली. मविआ स्थापन करताना उद्धव शिवसेनेच्या मूळ ‘ध्येय, उद्दिष्टां’पासून दूर गेल्याचा ठपका शिंदे गटाने ठेवला होता. हा मुद्दा शिंदे व ठाकरे यांच्या मतभेदाचे मूळ असल्याचे आयोगाने म्हटले. 

दुरुस्तीची माहिती नाही आयोगाने २०१८ च्या शिवसेनेच्या घटनेची तपासणी केली. घटनेत बदल केल्याचे कोणतेही पत्र पक्षाने आयोगाला दिले नाही. २०१८ मध्ये प्रतिनिधी सभेत उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतल्याचा दावा ठाकरे गटाने केला होता. 

पदाधिकारी यादी दिलेली नाही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व संघटनात्मक निवडणुकांच्या संदर्भात आयोगाकडे कोणतीही माहिती दिलेली नाही.

मिळालेल्या मतांचाही विचारआयोगाने निवडणून आलेले लोकप्रतिनिधी व त्यांना मिळालेल्या मतांना सुद्धा हा निर्णय घेताना गृहित धरले. बहुमत चाचणीमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व हे स्पष्ट असल्याचे नमूद केले आहे. शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत. त्यांना ३६ लाख ५७ हजार मते मिळाली आहेत. शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांपैकी हे ७६ टक्के मते आहेत. याउलट ठाकरे गटाच्या १५ आमदारांना ११ लाख २५ हजार मते मिळाली आहेत. त्याचप्रमाणे १३ खासदार शिंदे गटाकडे आहेत. त्यांना ७४ लाख ८८ हजार मते मिळाली आहेत. ही टक्केवारी शिवसेनेच्या एकूण मतांपैकी ७३ टक्के एवढी आहे तर ठाकरे गटाकडे ५ खासदार आहेत. त्यांना २७ लाख ५६ हजार मते मिळाली आहेत.

कोणाची खासगी मालमत्ता नाहीआम्ही पहिल्या दिवसापासून खरी शिवसेना हीच आहे, हे सांगत होतो. ही विचारांची शिवसेना आहे, तो विचार पुढे नेण्याचे काम शिंदे करतायत. खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर कुणी अधिकार सांगू शकत नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अखेर हा सत्याचा विजयहा लोकशाहीचा विजय आहे, हा बहुमताचा विजय आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या विचारांचा विजय आहे. माझ्यासोबत असलेले सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, ज्यांनी माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला, त्या सगळ्यांचा विजय आहे. अखेर हा सत्याचा विजय आहे.    - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे