शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 10:15 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी 'गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक' मंजूर केले.

नवी दिल्ली: केंद्र सरकार आज लोकसभेत दिल्ली सेवा विधेयक मांडणार आहे. कामकाजाच्या सुधारित यादीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विधेयक सभागृहात मांडणार आहेत. त्याचवेळी गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे विधेयक मांडण्याच्या कारणांवर सभागृहात निवेदन देतील.

विधेयक मंजूर झाल्यानंतर लागू होणारा कायदा दिल्ली सेवा अध्यादेशाची जागा घेईल, ज्यात दिल्लीत वरिष्ठ नोकरशहांच्या पोस्टिंग आणि बदलीसाठी प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे. सरकार ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (सुधारणा) विधेयकानुसार, बदली आणि पोस्टिंग दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीद्वारे केली जाईल. त्यात मुख्य सचिव आणि प्रधान गृह सचिव सदस्य म्हणून असतील. लेफ्टनंट गव्हर्नर समितीच्या सल्ल्याने बदल्या आणि नियुक्त्या करतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी 'गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक' मंजूर केले. केंद्राने १९ मे रोजी आणलेल्या अध्यादेशाच्या जागी तो आणला जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने या अध्यादेशाला कडाडून विरोध केला आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षही या अध्यादेशाच्या विरोधात आहेत. दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार केंद्राच्या या अध्यादेशाच्या विरोधात असून विरोधकांचा पाठिंबा मिळवत आहे. 

केंद्र आणि दिल्ली सरकारमध्ये वाद

या विधेयकावरुन केंद्र आणि केजरीवाल सरकारमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरू आहे. गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (GNCTD) कायदा, 1991 दिल्लीतील विधानसभा आणि सरकारच्या कामकाजासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करण्यासाठी लागू आहे. 2021 मध्ये केंद्र सरकारने त्यात सुधारणा केली होती. या दुरुस्तीअंतर्गत दिल्लीतील सरकारच्या कामकाजाबाबत काही बदल करण्यात आले. यामध्ये उपराज्यपालांना काही अतिरिक्त अधिकार देण्यात आले. त्यानुसार निवडून आलेल्या सरकारला कोणत्याही निर्णयासाठी एलजीचे मत घेणे बंधनकारक करण्यात आले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAmit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली