शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला, असा आहे निवडणूक कार्यक्रम; दिवाळीच्या आधी आणि नंतरही वाजणार प्रचाराचे फटाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 06:08 IST

नांदेड लाेकसभेसाठी २० नाेव्हेंबर, वायनाडसाठी १३ ला मतदान

नवी दिल्ली : अखेर महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. प्रचाराचे फटाके दिवाळीच्या आधी सुरू होतील आणि दिवाळी संपल्यानंतर अधिक जोमाने वाजतील. दोन टप्प्यांत निवडणुका होतील, असे धुरंधर अंदाज व्यक्त होत होते. मात्र, राज्यात एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. वेगवेगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीकडे अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी मंगळवारी झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली. १३ नोव्हेंबर व २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत झारखंडमध्ये निवडणुका पार पडतील व मतमोजणी २३ नोव्हेंबरलाच होईल. या घोषणेसोबतच दोन्ही राज्यांत निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.

५० ठिकाणी पाेटनिवडणुकायासोबतच विविध राज्यांतील ४८ विधानसभा व लोकसभेच्या दोन जागांसाठी दोन टप्प्यांत पोटनिवडणुका होतील. त्यातील ४७ विधानसभा व एका लोकसभा जागेसाठी (वायनाड) १३ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. एक लोकसभा (नांदेड) व एक विधानसभा जागेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकांची मतमोजणी देखील २३ नोव्हेंबरलाच होईल. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम -अधिसूचना -    २२ ऑक्टोबर २०२४उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख -    २९ ऑक्टोबर २०२४अर्ज परत घेण्याची अंतिम तारीख -    ४ नोव्हेंबर २०२४प्रचार ताेफा थंडावणार -    १८ नोव्हेंबर २०२४एक्झिट पाेल -    २० नोव्हेंबर २०२४

मुख्य निवडणूक आयुक्तांनी पेश केले दोन शेर...१. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांबाबत - जम्हूरियत के जश्न में आपकी शिरकत, दुनिया देखेगी नापाक इरादों के शिकस्त की कहानी२. ईव्हीएमबद्दल असलेल्या तक्रारींविषयी - कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना

रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत... पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीच्या मागणीसंदर्भात राजीवकुमार म्हणाले की, पोलीस महासंचालकांची निवड यूपीएससी करते. प्रकाश सिंग खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले होते. त्या अधीन राहून निर्णय घेऊ.

सर्व प्रमुख नेत्यांची अस्मिता पणालासध्याचे संख्याबळ असे... - एकूण जागा -२८८भाजप -    १०३शिंदेसेना -    ३९अजित पवार गट - ३९काँग्रेस -    ३७उद्धवसेना -    १५शरद पवार गट     - १२बविआ -    ३समाजवादी पार्टी -    २एमआयएम -    २प्रहार जनशक्ती -    १मनसे -    १स्वाभिमानी पक्ष     -    १शेकाप -        १रासप -    १माकप -    १क्रांशेपा -    १जनसुराज्य शक्ती -    १अपक्ष -    १३रिक्त     १४(अजित पवार गटातून बाहेर पडलेले बबन शिंदे सध्या कोणत्याही पक्षात नाहीत.)

झारखंडमध्ये दाेन टप्पे -टप्पा १ - नाेव्हेंबर - १३टप्पा २ - नाेव्हेंबर - २०निकाल - नाेव्हेंबर - २३जिल्हे - २४ I जागा - ८१ I मतदार - २.६ कोटीसत्तारूढ महागठबंधनझारखंड मुक्ती मोर्चा     २७काँग्रेस     १८राजद     १माकप     १

एनडीए भाजप     २४आजसू     ३अजित पवार गट     १अपक्ष, अन्य     ६

असा आहे निवडणूक कार्यक्रम                     पहिला टप्पा    दुसरा टप्पाअधिसूचना         १८ ऑक्टोबर     २२ ऑक्टोबर अर्जाची अंतिम तारीख    २५ ऑक्टोबर     २९ ऑक्टोबर परत घेण्याची अंतिम तारीख  ३० ऑक्टोबर     १ नोव्हेंबर प्रचार ताेफा थंडावणार       ११ नोव्हेंबर     १८ नोव्हेंबरएक्झिट पाेल               २० नोव्हेंबर 

१.८५ कोटी २० ते २९ वयोगटातील मतदार ६,३६,२७८ दिव्यांग मतदार२०,९३,००० - १८ ते १९ वयोगटातील नवमतदार १२,४३,१९२ - ८५ वर्षांवरील मतदार 

कर्तव्य बजावण्यास सज्ज व्हा...मतदारांची संख्या (कोटी)        २०१९    २०२४  पुरुष        ४.६९    ४.९७     महिला    ४.२८        ४.६६ तृतीयपंथी    २,६३७*    ६,०३१*                 *हजार

२०१९ - ८,९८,३८,२६७२०२४ - राज्यात ६६ लाखांनी वाढले मतदार

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024