शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

चक्क मृतांनी रुग्णालयांत जाऊन घेतले उपचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 06:49 IST

- बलवंत तक्षक लोकमत न्यूज नेटवर्क चंडीगड : एखादी मृत व्यक्ती रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकते काय? इतर ठिकाणचे माहीत ...

- बलवंत तक्षकलोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : एखादी मृत व्यक्ती रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकते काय? इतर ठिकाणचे माहीत नाही पण हरयाणाचे म्हणाल तर तेथे हे शक्य आहे. राज्यातील काही मृतांनी चक्क रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. हा चमत्कार इथेच थांबत नाही तर तब्बल १४२१ रुग्णांनी (मृतांसह) एकाच दिवशी अनेक रुग्णालयांत उपचार घेतले. खोटी बिले उचलण्यासाठी आयुष्मान भारत योजनेत ही खाबूगिरी करण्यात आल्याचे महालेखापालांच्या (कॅग) अहवालातून समोर आले. आयुष्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वैद्यकीय उपचारासाठी पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते.

कॅगच्या अहवालात हरयाणातील वैद्यकीय घोटाळ्याचा पर्दाफाश करताना आयुष्मान भारत योजनेतील अनेक त्रुटींवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. २०१८ ते २०२१ दरम्यानचा हा अहवाल संसदेत मांडण्यात आला. मृतांना जिवंत दाखवून बिले उचलण्यात  आली. या बोगसगिरीत १३४ रुग्णालयांचा सहभाग असून, प्रशासनातील मंडळी आणि रुग्णालयांनी संगनमताने हा घोटाळा केला,  असे या अहवालात म्हटले आहे. 

कॅगने ज्या आकडेवारीचे विश्लेषण केले. त्यात पुरुष व गर्भवती महिलांशिवाय अन्य महिलांचाही समावेश आहे. अशा प्रकरणांत महिलेच्या प्रसूतीनंतर आईच्या आयुष्मान आयडीवर बाळांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे राष्ट्रीय आरोग्य  प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. परंतु, कॅगने हा दावा फेटाळून लावला आहे.

अन् ३५४ मृत झाले जिवंत...११४ अर्धवट कार्डवरही आठ लाखांची रक्कम जारी करण्यात आली. निवृत्तिवेतनधारकांनाही या योजनेत सहभागी करून घेता येत  नाही.  मात्र, त्यांनाही कार्ड जारी करून त्यांच्यावरील उपचारापोटी रुग्णालयांना २६ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. त्याचबरोबर ३५४ मृतांना जिवंत दाखवून त्यांच्यावरील उपचाराच्या नावाखाली ५४ लाख रुपये उचलण्यात आले. 

टॅग्स :fraudधोकेबाजी