शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोठी चपराक! संसद उद्घाटनविरोधी याचिका कोर्टाने फेटाळली, खडेबोल सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 06:36 IST

सुनावणीला नकार : कलम ७९ व समारंभाचा संबंध काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यासाठी लोकसभा सचिवालयाला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. 

ही याचिका का, कशी दाखल करण्यात आली हे न्यायालयाला समजते. यात लक्ष घालणे, हे न्यायालयाचे काम नाही. आम्ही तुम्हाला दंड ठाेठावत नाही, त्याबद्दल तुम्ही आभार मानायला हवे, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले. घटनेच्या कलम ३२ अंतर्गत न्यायालयाला या याचिकेवर सुनावणी करायची नाही, असे न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी व न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.  त्यामुळे आता उद्घाटनात कोणताही अडथळा राहिलेला नाही.

राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणीवकील जय सुकीन यांनी ही याचिका दाखल केली होती. ते म्हणाले की, राष्ट्रपतींना उद्घाटनासाठी आमंत्रित न करून त्यांचा “अपमान” करत आहेत. घटनेच्या कलम ७९ नुसार राष्ट्रपती हे देशाच्या कार्यकारी मंडळाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना निमंत्रित करायला हवे होते. 

भवनाच्या उभारणीत महाराष्ट्राचा वाटाn नव्या संसद भवनात देशातील सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन घडणार आहे. भवनातील फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले आहे.  इमारतीसाठी वापरण्यात आलेले सागवान नागपुरातून मागविण्यात आले आहे. n तसेच अशाेक स्तंभ बनविण्यासाठी आवश्यक साहित्य औरंगाबाद येथून मागविण्यात आले आहे.n सजावटीसाठी कार्पेट उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर येथून तर बांबूचे फ्लाेअरिंग त्रिपुरा आणि विविध प्रकारचे खडक राजस्थानातून मागविण्यात आले आहे.

संत आणि पुराेहित राजधानीत दाखलनव्या संसद भवनाच्या  उद्घाटन समाराेहादरम्यान पूजा आणि हवन करण्यात येणार आहे. हे शुभकार्य करण्यासाठी तामिळनाडुतील विविध मठांचे संत व पुराेहित नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांचे आर. के. पुरम येथील मंदिरात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयParliamentसंसद