शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी नोकऱ्यांमधील ७५ टक्के आरक्षण कोर्टानं ठरवलं रद्द, या राज्य सरकारला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 18:16 IST

Reservation : गेल्या काही दिवसांपासून देशभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान, हरियाणामधील मनोहरलाल खट्टर सरकराला हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षणाची तरतूद पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने रद्द केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दरम्यान, हरियाणामधील मनोहरलाल खट्टर सरकराला हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षणाची तरतूद पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने रद्द केली आहे. हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे हायकोर्टाने आपल्या निकालामध्ये म्हटले आहे. हायकोर्टाने हरियाणा राज्य स्थानिक उमेदवार रोजगार अधिनियम २०२० बेकायदेशीर ठरवला आहे. सोबतच ही बाब अनियमित अत्यंत धोकाकादय असल्याचे आणि घटनेतील भाग-३ चे उल्लंघन आहे, असे कोर्टाने म्हटले आहे. 

हरियाणा सरकारच्या या निर्णयाविरोधात उद्योगांनी हायकोर्टात दाद मागितली होती. हरियाणा सरकार खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण आणू इच्छित आहे, ही बाब नियोक्त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन आहे, असं याचिकेत म्हटलं होतं.  त्यासाठी खासगी क्षेत्रातील नोकऱ्या ह्या पूर्णपणे कौशल्य आणि विश्लेषणात्मक मिश्रणावर आधारित आहेत. तसेच भारताचे नागरिक असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या आधारावर देशातील कुठल्याही भागात नोकरी करण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असा युक्तिवाद या याचिकेमधून करण्यात आला होता. 

खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण कायदा लागू करण्याचा अध्यादेश हरयाणा सरकारने २०२१ मध्ये काढला होता. हरयाणा राज्य स्थानिक व्यक्ती रोजगार अधिनियम २०२०, १५ जानेवारीपासून लागू करण्यात आला होता. त्याची अधिसूचना २०२१ मध्ये काढण्यात आली होती. हा कायदा १० वर्षांसाठी लागू राहील, असे सांगण्यात आले होते. तसेच स्टार्टअप कंपन्यांना यामद्ये २ वर्षांची सूट मिळेल, असेही सांगण्यात आले होते. तसेच आयटीआय उत्तीर्ण तरुणांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्यास सांगण्यात आले होते. 

टॅग्स :reservationआरक्षणjobनोकरीHaryanaहरयाणाCourtन्यायालय