शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांच्या ‘रेवडी संस्कृती’मुळे देशाची पत धोक्यात, मोफत योजनांचा फटका; १.७ लाख कोटींचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 06:56 IST

Rewadi Culture: निवडणुका जिंकण्यासाठी राज्यांकडून केल्या जाणाऱ्या लोकप्रिय घोषणा आणि बिनाशर्त रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. या मोफत योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढत असून, विकासासाठी आवश्यक असलेल्या भांडवली खर्चात मोठी घट होत आहे. 

नवी दिल्ली -  निवडणुका जिंकण्यासाठी राज्यांकडून केल्या जाणाऱ्या लोकप्रिय घोषणा आणि बिनाशर्त रोख रक्कम हस्तांतरणाच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर चिंतेचे ढग जमा झाले आहेत. या मोफत योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढत असून, विकासासाठी आवश्यक असलेल्या भांडवली खर्चात मोठी घट होत आहे. 

अहवालात राज्यांच्या या ‘आर्थिक शिस्ती’बाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकार विक्रमी सार्वजनिक गुंतवणूक करत असताना, दुसरीकडे अनेक राज्ये केवळ लोकप्रियतेसाठी महसुली खर्च वाढवत आहेत. 

राज्यांच्या तिजोरीवर मोठा ताण राज्यांमध्ये विशेषतः महिलांसाठी सुरू असलेल्या विनाअट रोख हस्तांतरण योजनांवर आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल १.७ लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. हा खर्च राज्यांच्या एकूण कल्याणकारी खर्चाचा एक मोठा हिस्सा बनला असून, यामुळे राज्यांच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. 

केवळ खर्च वाढविणे हा धोरणांचा उद्देश नको : यामुळे रस्ते, पूल आणि सिंचनासारख्या उत्पादन क्षमता वाढवणाऱ्या कामांसाठीचा पैसा या योजनांकडे वळवला जात आहे. केवळ खर्च वाढविणे हा वित्तीय धोरणांचा उद्देश नसावा, तर उत्पादन क्षमता, रोजगार आणि उत्पन्नवाढ यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यांनी शिस्त पाळली नाही, तर...  भारतीय सरकारी रोखे आता जागतिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध झाले आहेत. अशा स्थितीत राज्यांची बिघडलेली आर्थिक स्थिती ही केवळ स्थानिक समस्या राहिलेली नाही. राज्यांनी शिस्त पाळली नाही, तर त्याचा थेट परिणाम देशाच्या उधारी घेण्याच्या खर्चावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतमानांकनवर होऊ शकतो, असेही सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.

सोने-चांदीचे दर चढेच राहतील, तांबेही वाढणारजागतिक पातळीवरील अनिश्चितता कायम राहिल्यास सोने आणि चांदीचे दर उंचावलेल्या पातळीवरच राहण्याची शक्यता आहे. लोखंड, तांबे आणि ॲल्युमिनियम यांसारख्या बेस मेटल्सच्या किमती मध्यम प्रमाणात वाढू शकतील. हरित तंत्रज्ञान आणि डेटा सेंटर्समधील मागणीमुळे तांब्याचे दर उंचावलेलेच राहू शकतात, मात्र पुरवठ्यातील अडथळेही प्रभाव टाकतील, असे निरीक्षण असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Freebie Culture Imperils India's Finances: States' Schemes Add Burden

Web Summary : States' freebie schemes strain finances, diverting funds from crucial infrastructure. This impacts India's borrowing costs and international credit ratings. Gold, silver prices will stay high due to global uncertainties.
टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था