वाराणसी - विकसित देशांच्या आर्थिक वृद्धीमध्ये पायाभूत सुविधा हा मोठा घटक आहे. आज भारत देखील विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. त्यांनी वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघातील बनारस रेल्वे स्थानकावरून ४ नवीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखविला.
त्यानंतर त्यांनी सांगितले की, वंदे भारत ही भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेली आणि जिचा प्रत्येक भारतीय अभिमान बाळगतो, अशी रेल्वेगाडी आहे. परदेशी प्रवाशांकडूनही वंदे भारत रेल्वेगाडी बघून चकित झाले आहेत.ते म्हणाले की, धार्मिक पर्यटन आज उत्सवामध्ये मोठे साधन बनले आहे. उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटनामुळे विकासाची नवी लाट आली असून, यात्रेकरूंमुळे राज्याला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळाला, असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आता देशात १६० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत.
'सांस्कृतिक, धार्मिक स्थळांना जोडणारा दुवा'- नरेंद्र मोदी यांनी दाखविलेल्या चार वंदे भारत रेल्वेगाड्या बनारस-जयनगर, खडकी-वडनगर, फिरोजपूर-दिल्ली आणि उंकुलम्-बंगळुरू या मार्गांवर धावणार आहेत.- बनारस-खजुराहो वंदे भारत एक्स्प्रेस वाराणसी, प्रयागराज आणि चित्कूट या प्रमुख सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांना जोडणारा दुवा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर मंत्री उपस्थित होते.
Web Summary : PM Modi launched four new Vande Bharat Express trains from Varanasi, highlighting India's rapid development and the trains' role in boosting tourism and connecting cultural sites. He emphasized their Indian origin and significant revenue contribution to Uttar Pradesh.
Web Summary : वाराणसी से पीएम मोदी ने चार नई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनों का शुभारंभ किया, भारत के तीव्र विकास और पर्यटन को बढ़ावा देने में ट्रेनों की भूमिका पर प्रकाश डाला। उन्होंने इनके भारतीय मूल और उत्तर प्रदेश को महत्वपूर्ण राजस्व योगदान पर जोर दिया।