शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 09:25 IST

ज्येष्ठ अधिवक्ता सिंघवी म्हणाले, आमची तक्रार असूनही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नावाचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या कोणत्याही कागदपत्रात नाही. आयोगाने कोणालाही ताकीद दिली नाही किंवा कोणतेही निर्बंध लादले नाहीत. 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाचे पत्र तसेच मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी डेटा संकेतस्थळावर टाकण्यास निवडणूक आयोगाने नकार देणे ही घटनात्मक संस्था असलेल्या निवडणूक आयोगाची कृती निषेधार्ह असून, यामुळे आयोगाचा पर्दाफाश झाल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगासारखी संस्था अशा प्रकारे सत्ताधारी पक्षाकडे झुकली तर याचा अर्थ लोकशाही धोक्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.

आयोग कोणत्याही पक्षाचा निवडणूक एजंट नाहीज्येष्ठ अधिवक्ता सिंघवी म्हणाले, आमची तक्रार असूनही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या नावाचा उल्लेख निवडणूक आयोगाच्या कोणत्याही कागदपत्रात नाही. आयोगाने कोणालाही ताकीद दिली नाही किंवा कोणतेही निर्बंध लादले नाहीत. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या स्टार प्रचारकांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करू नये असे सांगितले. या सर्व गोष्टी घटनात्मक पातळीवरील उच्चस्तरीय संस्थेला शोभत नाहीत. हे संस्थेच्या घटनात्मक जबाबदाऱ्यांच्या विरोधात आहे. ते म्हणाले की, हा निवडणूक आयोग आहे, कोणत्याही पक्षाचा निवडणूक एजंट नाही.

जेव्हा कोणतीही घटनात्मक संस्था राज्यघटनेचे पालन करत नाही आणि सत्तेकडे झुकते आहे, तेव्हा लोकशाही धोक्यात आली आहे, हे समजले पाहिजे. भाजप नेते उघडपणे जातीयवादी वक्तव्ये करतात आणि त्याची काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याशी तुलना केली जाते, हे दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते, पण त्याला विरोध करणे दुर्दैवी आणि निषेध करण्यासाठी पुरेसे आहे. यातून निवडणूक आयोगाचा पर्दाफाश होतो.- अभिषेक मनु सिंघवी, प्रवक्ते, काँग्रेस 

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा