शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

 एसीची थंड हवा पृथ्वीला भाजून काढणार! कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनापेक्षाही मोठी हानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 08:13 IST

एअर कंडिशनरमधील सर्वात सामान्य रेफ्रिजरंट्सपैकी एक म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्स (एचएफसी). त्यात कार्बन डाय ऑक्साइडपेक्षा १००० पट अधिक तापमानवाढ शक्ती असू शकते. 

नवी दिल्ली : सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक उत्पादकतेसाठी एसी चांगले आहेत, परंतु, हवामानासाठी घातक आहेत. स्वस्त एसी युनिट्समध्ये वापरले जाणारे रेफ्रिजरंट कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनापेक्षा अधिक धोकादायक आहे. स्वस्त एसी विकसनशील देशांमध्ये विकले जातात. सिंगापूरमधील जागतिक बँकेचे हवामानतज्ज्ञ आभास झा म्हणतात की, कार्यक्षमता सुधारली नाही तर ते पृथ्वीला भाजून काढतील.

भारतासारख्या देशात वाढत्या तापमानासोबतच रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. या आठवड्याच्या अखेरीस उत्तरेकडील मैदानी भागात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, भारतासह चीन, इंडोनेशिया आणि फिलिपाइन्स सारख्या देशांमध्ये एअर कंडिशनर्सची मागणी वाढत आहे. एका अंदाजानुसार, दशकाच्या अखेरीस जगात आणखी एक अब्ज एसी असतील. २०४० पूर्वी एअर-कंडिशनर मार्केट जवळजवळ दुप्पट होईल असा अंदाज आहे.

अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की, या वर्षी प्रथमच दरडोई उत्पन्न ९००० डॉलरपेक्षा जास्त असेल. त्यामुळे एसीची खरेदी आणखी वाढू शकते.

फटका कशामुळे?एअर कंडिशनरमधील सर्वात सामान्य रेफ्रिजरंट्सपैकी एक म्हणजे हायड्रोफ्लोरोकार्बन्स (एचएफसी). त्यात कार्बन डाय ऑक्साइडपेक्षा १००० पट अधिक तापमानवाढ शक्ती असू शकते. 

पुढील ५ वर्षे कडक उन्हाचा तडाखा!- हवामान बदलाशी झुंजत असलेल्या जगाला संयुक्त राष्ट्रांचा इशारा चिंताजनक आहे. - संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने हरितगृह वायू आणि एल निनो यांच्या संयोगामुळे पुढील पाच वर्षे (२०२३-२०२७) विक्रमी उष्णतेचा अंदाज वर्तवला. - २०१५-२०२२ कालावधीतील आठ सर्वांत उष्ण वर्षांची नोंद झाली आहे. यापुढेही तापमानात वाढीची भीती आहे.

 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणTemperatureतापमान