शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार हुकमी एक्का बाहेर काढणार; महिला आरक्षण विधेयक सादर करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 12:10 IST

१८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात एक देश, एक निवडणूक या मुद्द्यानंतर आता महिला आरक्षण विधेयक आणण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

- संजय शर्मा

नवी दिल्ली : पाच दिवसांच्या विशेष संसद अधिवेशनात निवडणूक अजेंड्यामुळे केंद्र सरकार महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर करू शकते. महिला आरक्षणाच्या निमित्ताने देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या मतांवर नजर आहे. १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनात एक देश, एक निवडणूक या मुद्द्यानंतर आता महिला आरक्षण विधेयक आणण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महिला आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने देशाच्या अर्ध्या लोकसंख्येच्या मतांना लक्ष्य केले जात आहे. महिला मतदारांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूपच लोकप्रियता आहे. तीन तलाक संपवल्यानंतर मुस्लीम महिलांनी मोठ्या संख्येने नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिलेला आहे. महिला आरक्षण विधेयक आणल्यास भाजपला २०२४ मध्ये महिलांची मते मोठ्या प्रमाणावर मिळू शकतात. या महिला आरक्षण विधेयकाला मोदी सरकारचा हुकमी एक्का मानला जात आहे. त्याचा वापर कधी करायचा, याची प्रतीक्षा पंतप्रधान मोदी करीत आहेत. 

व्होट बँकेवर नजरमहिलांना आरक्षण देण्याची प्रदीर्घ काळापासून मागणी होत आहे. भाजप याला पाठिंबा देत आला आहे. परंतु मोदी सरकारची ९ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांची आठवण आली आहे. याचे कारण हेच आहे की, २०२४चे जे काही निवडणूक सर्वेक्षण येत आहेत, त्या सर्वांमध्ये २०२४मध्ये भाजप आणि एनडीएला संख्या कमी दाखवली जात आहे. भाजपचा मतांचा टक्का वाढवण्यासाठी पंतप्रधान यांना हुकमाचे पत्ते काढावे लागत आहेत. महिला आरक्षणाही सरकारचा हुकमाचा एक्का मानले जात आहे. महिला आरक्षण विधेयक संसदेत पारीत झाल्यास लोकसभेतील ३३% जागा महिलांसाठी आरक्षित होतील. त्यानुसार, १८० एवढी लोकसभेच्या एकूण जागांच्या संख्येत वाढ होईल.महिला आरक्षण आणण्याबाबत यापूर्वीही हालचाली झाल्या होत्या. परंतु तेव्हा आरक्षणामध्ये आरक्षण देण्याची मागणी आल्यानंतर ते अडकले होते. ज्याप्रमाणे लोकसभेत ५४३ जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी जागा आरक्षित आहेत, त्याच आधारावर महिलांसाठीही जागा आरक्षित असाव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :Parliamentसंसद