शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:49 IST

Rashtriya Swayamsevak Sangh News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त २६ ऑगस्टपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे तीन दिवसीय व्याख्यानमालेमध्ये संबोधित करणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यावर्षी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त २६ ऑगस्टपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे तीन दिवसीय व्याख्यानमालेमध्ये संबोधित करणार आहेत. तसेच यामध्ये अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रभारी सुनील आंबेकर यांनी सांगितले की, आम्ही समाजातील सर्व वर्ग, समुदाय आमि विचारसरणीच्या लोकांशी संपर्क साधला आहे. तसेच जगभरातील विविध देशांच्या दूतावासांनाही निमंत्रण पाठवण्यात येत आहे. मात्र पाकिस्तान, तुर्कीए आणि बांगलादेश यांना हे निमंत्रण पाठवण्यात येणार नाही.

संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात येण्याची शक्यता नाही आहे. जे नेते आमच्या संपर्कामध्ये असतात. तसेच ज्यांचे आमच्यासोबत संबंध आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क साधत आहोत. मात्र जे नेते आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करणार नाहीत, अशा लोकांना बोलावण्याला काही अर्थ नाही, असे संघातील सूत्रांनी स्पष्ट केले पाहिजे.

दरम्यान, या कार्यक्रमामध्ये देश, विदेशातील अनेक संस्थांशी आम्ही संपर्क साधला आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आम्ही पाकिस्तान, तुर्कीए आणि बांगलादेश या  देशांच्या दूतावासांना निमंत्रण देणार नाही, असे संघाने स्पष्ट केले आहे. बांगलादेशमधील सरकारने गेल्या काही काळापासून भारतविरोधी भूमिका घेतली आहे. तर तुर्कीएने ऑपरेशन सिंदूरदरम्यान  पाकिस्तानला मदत केली होती. दरम्यान, या कार्यक्रमासाठी संघाकडून नितमंत्रित करण्यात येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीमध्ये अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधी, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती, विचारवंत, उद्योजक आणि बुद्धिजीवींचा समावेश असेल. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतRSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय