शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 06:09 IST

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात नवतपामुळे अनेक जिल्ह्यात पारा ४० च्या पुढे गेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आकाशातून अक्षरशः आग ओकणाऱ्या सूर्याने मंगळवारी राजधानी दिल्लीत ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. तीव्र उष्णतेच्या लाटेत होरपळून निघालेल्या दिल्लीत आज नरेला आणि मुंगेशपूर भागात ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे दिल्लीतील तापमान हे सरासरीपेक्षा तब्बल ९ अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तर व मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. राजस्थानच्या चुरू व हरयाणातील सिरसामध्ये पारा ५० च्या पुढे गेला. दुसरीकडे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात नवतपामुळे अनेक जिल्ह्यात पारा ४० च्या पुढे गेला आहे.

दिल्लीत सोमवारी याच भागात ४८.८ अंश सेल्सिअस तापमानाचा विक्रम नोंदविला गेला होता, पण २४ तासांच्या आतच तो मोडीत निघाला. मुंगेशपूर आणि नरेला येथे प्रत्येकी ४९.९ अंश, नजफगढ येथे ४९.८ अंश, जाफराबाद येथे ४८.६ अंश पितमपुरा आणि पुसा येथे ४८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. राजधानीत अन्य भागांमध्येही तापमान ४५ ते ४७ अंशांदरम्यान नोंदविले गेले. 

केरळमध्ये जोरदार पाऊस

केरळच्या अनेक भागात मंगळवारी जोरदार वाऱ्यासह संततधार पाऊस झाला. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोचीतील रस्ते पाण्याखाली गेले. कोल्लम, कोट्टायम आणि एर्नाकुलम या दक्षिण आणि मध्य जिल्ह्यांना संततधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला. 

काॅंक्रिटीकरणामुळे रात्रीही वाढला असह्य उकाडा

नवी दिल्ली :  सिमेंटचे रस्ते तसेच बेसुमार कॉंक्रिटीकरणामुळे व वाढत्या नागरीकरणामुळे देशातील सुमारे १४० शहरांमध्ये रात्रीच्या वेळी ६० टक्के जास्त उकाडा जाणवत असल्याचे आयआयटी भुवनेश्वरने केलेल्या संशोधनातून पुढे आले आहे. शहरांत सिमेंटचे रस्ते  दिवसभर तापतात आणि सायंकाळनंतर त्यातून उष्णता बाहेर पडते. त्यामुळे रात्री उकाडा जाणवत असल्याचे म्हटले आहे.

ग्रामीणच्या तुलनेत शहरातील तापमानवाढ

  • शहरांतील रात्रीच्या तापमानात १० वर्षांतील वाढ : ०.५३ अंश सेल्सिअस
  • ग्रामीण भागातील रात्रीच्या तापमानात १० वर्षांतील वाढ : ०.२६ अंश सेल्सिअस
टॅग्स :delhiदिल्लीVidarbhaविदर्भHaryanaहरयाणाRajasthanराजस्थान