शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

‘मेमंथा सिद्धम’ने सुरू झाली निवडणुकांची रणधुमाळी, सर्वच पक्षांनी कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 12:25 IST

जगन यांचा दौरा कडप्पा येथील इदुपुलुपाया येथून सुरू झाला. २१ जिल्हे आणि १४८ विधानसभा मतदारसंघांमधून जाईल आणि उत्तर आंध्र प्रदेशात प्रचार मोहिमेचा समारोप होईल.

- डॉ. समीर इनामदारअमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी वायएसआर काँग्रेस याही निवडणुकीत आपले वर्चस्व कायम राखते का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेशच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. आंध्र प्रदेशच्या १७५ विधानसभा आणि २५ लोकसभेच्या जागांसाठी एकाच वेळी १३ मे रोजी निवडणूक होणार असून, ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) प्रमुख आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी कडप्पा येथून ‘मेमंथा सिद्धम’ (आम्ही सर्व तयार आहोत) या २१ दिवसांच्या बस दौऱ्याला आंध्र प्रदेशातील आगामी निवडणुकांसाठी प्रारंभ केला.

जगन यांचा दौरा कडप्पा येथील इदुपुलुपाया येथून सुरू झाला. २१ जिल्हे आणि १४८ विधानसभा मतदारसंघांमधून जाईल आणि उत्तर आंध्र प्रदेशात प्रचार मोहिमेचा समारोप होईल. जगन यांनी वडील आणि माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या पुतळ्याला इडुपुलुपया येथील वायएसआर घाट येथे पुष्पहार अर्पण करून दौऱ्याची सुरुवात केली. हा घाट पुलिवेंदुला विधानसभा मतदारसंघात असून, जगन हे या मतदारसंघातून आमदार आहेत. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनीही या निवडणुकीत उमेदवार घोषित केले आहेत.

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडूही प्रचारात व्यस्त आहेत. कुप्पम या त्यांच्या गृह मतदारसंघात त्यांनी दोन दिवस प्रचार केला. तर, जनसेनाप्रमुख पवन कल्याण हेदेखील ३० मार्च रोजी अनकापल्ले येथून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. अभिनेते असणारे पवन कल्याण हे अनकापल्ले मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

२०१९ ची स्थितीलोकसभा निवडणूकएकूण जागा    २५वायएसआर काँग्रेस    २२तेलुगू` देसम पार्टी    ३काँग्रेस    ०भाजप    ०जनसेना पार्टी    ०विधानसभा निवडणूकएकूण जागा    १७५वायएसआर काँग्रेस    १५१तेलुगू देसम पार्टी    २३काँग्रेस    ०भाजप    ०जनसेना पार्टी    १ 

टॅग्स :andhra pradesh lok sabha election 2024आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४