अडगाव-सिरसोली रस्त्याचे थातूरमातूर डांबरीकरण
By admin | Updated: May 6, 2014 16:26 IST
सिरसोली : अडगाव-सिरसोली या ६ कि. मी. अंतरामधील जो चांगल्या स्थितीतील रस्ता होता त्यावर गिी टाकून थातूरमातूर डांबरीकरण करण्यात आले आहे.
अडगाव-सिरसोली रस्त्याचे थातूरमातूर डांबरीकरण
सिरसोली : अडगाव-सिरसोली या ६ कि. मी. अंतरामधील जो चांगल्या स्थितीतील रस्ता होता त्यावर गिी टाकून थातूरमातूर डांबरीकरण करण्यात आले आहे.वास्तविक पाहता सिरसोली ते अडगावमधील ३ कि. मी. रस्ता हा खूप खराब झाला; पण हा रस्ता सोडून जो चांगला रस्ता होता, त्याचेच पूर्ण डांबरीकरण करण्यात आले. तेसुद्धा फक्त गिी व थोड्या प्रमाणात डांबर टाकून करण्यात आले. रस्ता पूर्ण झाला नाही. मागील रस्ता उखडण्यास सुरुवात झाली आहे. रस्ता उखडल्यामुळे दोन चाकी गाड्या घसरून अपघात होत आहेत. या रस्त्याबाबत ठेकेदारास विचारले असता तो उत्तर देण्यास तयार नाही. या रस्त्याची चौकशी करण्यात यावी व रस्ता पूर्ण बनवण्यात यावा, अशी मागणी छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष बजरंग वनकर यांनी केली आहे. (वार्ताहर)