शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 15:24 IST

भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते.

भारतीय एथलेट राहिलेल्या अंजू बॉबी जॉर्जने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मनातील खंत बोलून दाखवली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित क्रिसमसच्या एका नरेंद्र मोदींसह दिग्गजांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना अंजू बॉबीने नरेंद्र मोदींनी देशातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याचं म्हटलं. बॉबी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात खेळाबद्दल अधिक उत्साह नसल्याचे सांगितले.

मी चुकीच्या काळात देशाच्या क्रीडा क्षेत्रात कार्यरत होते. आता, भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते, असे बॉबी जॉर्जने म्हटले. बॉबीच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मीतहास्य करत दाद दिली. अंजू जॉर्जने मोदींकडे पाहून म्हटले की, एक खेळाडू म्हणून मी साधारपणे २५ वर्षे इथं आहे. या काळात देशातील क्रीडा क्षेत्रात मी खूप बदल पाहिला आहे. जेव्हा २० वर्षांपूर्वी मी भारतासाठी पहिलं जागतिक पदक जिंकलं होतं, तेव्हा माझा विभागही माझ्या प्रमोशनसाठी तयार नव्हता. मात्र, नीरज चोप्राने पदक जिंकल्यानंतर मी बदल अनुभवला. ज्या पद्धतीने आपण हा विजय सेलिब्रेट करतोय, मला ईर्ष्या होते, कारण मी खेळात चुकीच्या वेळेत होते, असे बॉबी जॉर्जने म्हटले. बॉबी यांच्या या विधानावर पंतप्रधान मोदींनी हसून दाद दिली. 

महिला सशक्तीकरण आता केवळ शब्द राहिला नसून प्रत्येक भारतीय तरुणी, महिला स्वप्न पाहत आहे. कारण, त्यांना माहिती आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, असेही बॉबी यांनी म्हटलं. 

कोण आहे अंजू बॉबी जॉर्ज

अंजू बॉबी जॉर्ज ह्या भारतीय एथलेट राहिल्या आहेत२००३ मध्ये पॅरिस येथे आयोजित जागतिक एथलेट चॅम्पियनशीपमध्ये लांब उडीत त्यांनी कास्य पदक जिंकले होते. जागतिक एथलेट चॅम्पियनशीपमध्ये लांब उडी क्रीडा प्रकारात ६.७० मीटर लांब उडी घेऊन कास्य पदक जिंकणारी अंजू बॉबी जॉर्ज ह्या पहिल्या भारतीय महिला एथलेट आहेत. २००५ मध्ये जागतिक एथलेटीक्स फायनलमध्ये अंजू बॉबीने सिल्व्हर मेडल जिंकले होते. ही कामगिरी त्या सर्वोत्तम मानतात. अंजू बॉबी जॉर्ज यांना जागतिक एथलेटिक्सने वुमन ऑफ द ईडर २०२१ पुरस्काराने सन्मानित केलं आहे.अंजू बॉबी यांनी २०१६ साली मुलींसाठी खेळ अकॅडमीही सुरू केली, ज्यातून मुलींना क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी प्रेरीत केलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNeeraj Chopraनीरज चोप्राChristmasनाताळIndiaभारत