शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात सरकारविरोधात ‘ते’ स्टिंग राजकीय हेतूने; दंगल पूर्वनियोजित हा आरोपही खोटा - अमित शहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 09:35 IST

गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये २००२ साली दंगे झाले, ही वस्तुस्थिती कोणीही नाकारत नाही. मात्र, या दंग्यांच्या निमित्ताने गुजरात सरकारविरोधात राजकीय हेतूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधील निष्कर्ष मान्य करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. अनेक खोटेनाटे पुरावे मोदी, गुजरात सरकारविरोधात उभे करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदी व अन्य लोकांना क्लीन चिट देणारा एसआयटीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्या निर्णयानंतर अमित शहा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेली जातीय दंगल पूर्वनियोजित होती, त्यात गुजरात सरकार, नरेंद्र मोदी यांचा हात होता, असे खोटेनाटे आरोप झाले होते. ते म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी दंगे झाले आहेत. काँग्रेस व भाजप सरकारच्या कोणत्याही पाच वर्षांच्या कार्यकाळाची तुलना करून बघा, सर्वाधिक दंगे कोणत्या पक्षाच्या राजवटीत झाले आहेत, याचा नीट उलगडा होईल. गुजरातमधील दंगलींचे मूळ कारण रेल्वेगाडी पेटवून देण्याच्या एका घटनेत होते. त्या हत्याकांडात ६० लोकांना व आपल्या आईच्या कुशीत बसलेल्या १६ दिवसांच्या अर्भकालाही निर्घृण पद्धतीने जिवंत जाळण्यात आले होते. त्या घटनेत मरण पावलेल्यांपैकी काही जणांचे मी स्वत: अंत्यसंस्कार केले होते. गोध्रा हत्याकांडाचा सर्वात प्रथम भाजपने निषेध केला होता. विरोधी पक्ष मूग गिळून गप्प होते. 

‘शीख विरोधी दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी आम्ही स्थापन केली’केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, दिल्लीमध्ये शीखांच्या विरोधात दंगल झाली. त्यावेळी तीन दिवस ही दंगल रोखण्यासाठी लष्कर किंवा कोणत्याही सुरक्षा दलाला बोलाविले नव्हते. या दंगलीची चौकशी करण्यास एकही एसआयटी स्थापन करण्यात आली नव्हती. भाजपचे केंद्रात सरकार आल्यानंतर ही एसआयटी नेमण्यात आली. आम्ही आरोपींना अटक केली. 

खोटेपणाचा बुरखा फाडायलाच हवाअमित शहा म्हणाले की, गुजरात दंगलीबाबत राज्यातील तत्कालीन मोदी सरकारवर केलेल्या खोट्या आरोपांविरोधात आम्ही प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला. खोटेपणाचा बुरखा फाडणे आवश्यक असते. दंगली घडविण्यामध्ये कोणताही सहभाग नसल्याची क्लीन चिट सर्वोच्च न्यायालयाने दिली. मुसलमानांच्या मताविना भाजप सरकार बनवू शकतो असा आरोप होत असतो. त्याबाबत अमित शहा म्हणाले की, देशात गुजरात मॉडेल म्हणून काही गोष्टी निश्चितच अस्तित्वात आल्या आहेत. आम्ही राज्यात २४ तास वीज सर्वांना उपलब्ध करून दिली. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे थांबविली. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहGujaratगुजरात