शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगांना ११ हजार कोटींचे पॅकेज, ७ लाख नोकऱ्या मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 07:26 IST

महाराष्ट्रासह आठ राज्यांना फायदा; ७ लाख नोकऱ्या मिळणार

ठळक मुद्देकेंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की. मानवनिर्मित फायबर कपड्याच्या निर्मितीसाठी ७ हजार कोटी व तांत्रिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या कापडासाठी सुमारे ४ हजार कोटी केंद्र सरकार देईल.

नवी दिल्ली : वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ११ हजार कोटींच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. यामुळे महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या आठ राज्यांना फायदा होईल. यातून ७ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महाराष्ट्रातील इचलकरंजी, मालेगाव, भिवंडी आदी ठिकाणच्या वस्त्रोद्योगालाही याचा लाभ होईल. सध्या अडचणीत  असलेल्या वस्त्रोद्योगाला यातून संजीवनी मिळू शकणार आहे. 

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की. मानवनिर्मित फायबर कपड्याच्या निर्मितीसाठी ७ हजार कोटी व तांत्रिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या कापडासाठी सुमारे ४ हजार कोटी केंद्र सरकार देईल. भारतातून जे कापड निर्यात होते, त्यात मानवनिर्मित कापडाचा वाटा फक्त २० टक्के आहे. कंपन्यांनी वर्षागणिक उत्पादनात वाढ केल्यास त्यांना त्यानुसार केंद्र सरकार मदत करणार आहे. भारतात १३ क्षेत्रांसाठी केंद्र सरकारने प्रोत्साहनपर योजना जाहीर केली आहे. त्यातील वस्त्रोद्योगाबाबत जाहीर झालेल्या योजनेच्या अनुषंगाने केंद्र सरकार लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करेल. वस्त्रोद्योगामध्ये जगातील इतर देश भारतापेक्षा खूपच पुढे आहेत. या देशांनी कशा प्रकारे प्रगती केली याचीही माहिती केंद्र सरकारने घेतली आहे. देशातील वस्त्रोद्योगाला मोठी परंपरा आहे. 

निर्यात वाढविणार अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, वस्त्रोद्योगामध्ये भारताला आणखी नेत्रदीपक कामगिरी करायची आहे. भारतात तयार होणाऱ्या वस्त्रांची निर्यातही अधिक प्रमाणात करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. त्याचसाठी या क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. याच दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्रिमंडळाने वस्त्रोद्योगासाठी विशेष योजना जाहीर केली.

 

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरTextile Industryवस्त्रोद्योग