शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सीरम इन्स्टिट्यूटला फटका, कोवोवॅक्सच्या चाचण्यांस परवानगी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 05:55 IST

केंद्र सरकार; सीरम इन्स्टिट्यूटला फटका

ठळक मुद्देदेशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची व त्यात लहान मुलांना सर्वात जास्त धोका असण्याची शक्यता काही जणांनी वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वपूर्ण ठरते

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : २ ते १७ वर्षे वयाच्या मुलांवर कोवोवॅक्स लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या करण्यास सीरम इन्स्टिट्यूटला केंद्र सरकारच्या अखत्यारीतील केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ)  तज्ज्ञ समितीने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या कंपनीला मोठा फटका बसला आहे. 

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची व त्यात लहान मुलांना सर्वात जास्त धोका असण्याची शक्यता काही जणांनी वर्तविली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वपूर्ण ठरते. भारतामध्ये १० ठिकाणी २ ते ११ वर्षे व १२ ते १७ वर्षे या दोन वयोगटांतील मिळून ९२० मुलांवर कोवोवॅक्सच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्याची परवानगी सीरम इन्स्टिट्यूटने औषध महानियंत्रकांकडे सोमवारी मागितली होती. मात्र ती विनंती सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीने अमान्य केली.  कोवोवॅक्सच्या सध्या प्रौढ व्यक्तींवर चाचण्या सुरू आहेत. ही लस सुरक्षित असल्याचा या चाचण्यांमधील अहवाल प्रथम सादर करा. त्यानंतरच कोवोवॅक्स लसीच्या लहान मुलांवरील चाचण्यांना परवानगी द्यायची की नाही, याचा विचार करता येईल, असेही या समितीने म्हटले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAdar Poonawallaअदर पूनावाला