शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिसंग्रहालयातील सिंह, अन्य प्राण्यांची चाचणी, आयव्हीआरआय देणार लवकरच अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 06:54 IST

नवी दिल्ली : दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील सिंहांसह अन्य काही प्राण्यांच्या रक्ताचे नमुने कोरोना चाचणीसाठी उत्तर प्रदेशमधील बरेली येथील इंडियन ...

नवी दिल्ली : दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील सिंहांसह अन्य काही प्राण्यांच्या रक्ताचे नमुने कोरोना चाचणीसाठी उत्तर प्रदेशमधील बरेली येथील इंडियन व्हेटेरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट (आयव्हीआरआय)मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल लवकरच हाती येतील. (testing of Lions at the zoo and other animals, IVRI will report soon)या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे का? हे तपासण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचे संचालक रमेश पांडे यांनी सांगितले की, या प्राणिसंग्रहालयातील एकाही प्राण्याला कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही किंवा तसा अहवाल मिळालेला नाही. देशातील विविध प्राणिसंग्रहालयांमध्ये प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासूनच दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयातही नियमितपणे सॅनिटायझेशन करण्यातयेते. देशात याआधी उत्तर प्रदेशमधील इटावा सफारी पार्कमधील दोन सिंहिणींना कोरोनाची बाधा झाली होती. त्याशिवाय हैदराबादमधील नेहरु  झुऑलॉजिकल पार्कमधील चार सिंह व चार सिंहिणींना कोरोनाची लागण झाली होती. प्राण्यांना कोरोना संसर्ग होण्याचा प्रकार देशात प्रथम हैदराबाद येथेच घडला होता. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांकडून हा विषाणू प्राण्यांमध्ये संक्रमित झाल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेत कुत्रा, मांजरांनाही कोरोनाची लागण-    अमेरिकेत कुत्री, मांजरी यांच्यासह अन्य काही प्राणी कोरोनाबाधित झाल्याची उदाहरणे गेल्या काही महिन्यांत समोर आली आहेत.-    स्लोवेनिया येथे फेरिट या प्राण्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोना विषाणूचे प्राण्यांत अस्तित्व असण्याबद्दल काही देशांत सध्या संशोधन सुरू आहे. 

केंद्रीय वन्य व पर्यावरण खात्याने सांगितले की, दिल्लीतील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची प्रकृती उत्तम आहे. कोरोना विषाणूचा प्राण्यांमार्फत प्रसार होत नाही, असे एका पाहणीत आढळून आले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश