शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

'घराबाहेर पडाल तर...', हिजबुलची काश्मीर खोऱ्यात धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 09:07 IST

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहे.

श्रीनगर: राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. मात्र, आता येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यातच काश्मीर खोऱ्यातील लोकांना दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे. येथील स्थानिक नागरिक, दुकानदार आणि टॅक्सी चालकांना दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे. 

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्यावतीने एक पत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील दुकानदारांना दुकाने उघडी न ठेवण्याची आणि टॅक्सी चालकांना टॅक्सी न चालवण्याची धमकी दिली आहे. याशिवाय, येथील स्थानिक नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची धमकी दिली आहे. याचबरोबर, येथील शाळांना सुद्धा दहशतवाद्यांनी इशारा दिला आहे. कुठल्याही रस्त्यावर मुली शाळेत जाताना दिसता कामा नये, अन्यथा त्यांना धोक्याचा सामना करावा लागेल, असे दहशतवाद्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधीलकलम 370 रद्द केल्यानंतर दहशतवादी आणखीनच सैरभैर झाले आहेत. त्यामुळे दहशतवादी जम्मू काश्मीरमधील स्थिती बिघडवण्याच्या तयारीत आहेत. सध्या दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष केले जात आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील एका दुकानदारावर गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात दुकानदाराचा मृत्यू झाला. गुलाम मोहम्मद असे या दुकानदाराचे नाव होते.

दुसरीकडे, पाकिस्तानकडून भारतामध्ये कुरापती करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडविण्यासाठी पाकचे दहशतवादी मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे घुसखोरीच्या तयारीत, गुजरातमध्ये हाय अलर्ट जारीगेल्या काही दिवसांपूर्वी गुजरातच्या कांडलामध्ये कच्छ मार्गे पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी भारतामध्ये घुसखोरी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी कमांडो समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळताच बॉर्डर सिक्योरिटी फोर्स, इंडियन कोस्ट गार्ड यांनी हाय अलर्ट जारी केला आहे. समुद्र मार्गे भारतात येऊन दहशतवादी हल्ला करणार असल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370terroristदहशतवादी