शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच, पोलीस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला, पाच जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:21 IST

जम्मू काश्मीरमधील पुलवामा परिसरात गेल्या एक दोन दिवसांपासून दहशतवाद्यांनी थैमान घातले आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा परिसरात गेल्या एक दोन दिवसांपासून दहशतवाद्यांनी थैमान घातले असून, आज संध्याकाळी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हल्ला घडवून आणला. दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये पोलीस ठाण्याला लक्ष्य करून केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात पाच नागरिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पुलवामा येथे एका पोलीस ठाण्याला लक्ष्य करून ग्रेनेड फेकले होते. मात्र निशाणा चुकून हे ग्रेनेड पोलीस ठाण्याबाहेरच्या आवारात फुटले. त्यामुळे झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले. दरम्यान, सोमवारी पुलवामाजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले होते, तर दोन स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाले होते.  लष्कराच्या पेट्रोलिंग करणाऱ्या 44 आरआर या मोबाईल व्हॅनला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता.   अनंतनाग परिसरात मंगळवारी सकाळपासून भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या  चकमकीत लष्कराने सज्जाद भट या दहशतवाद्याला ठार केले. सज्जाद हा  पुलवामा हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांमधील एक आणि जैशचा कमांडर होता. त्याच्यासोबत आणखी एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद