शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

कलम ३७० हटल्यानंतर काश्मीरचे नागरिकत्व मिळवणाऱ्या पंजाबी ज्वेलरची दहशतवाद्यांकडून हत्या

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 08:47 IST

Terror Attack in Srinagar : कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देकलम ३७० हटवल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलांनुसार सर्वप्रथम नागरिकत्व प्रमाणपत्र घेणाऱ्या सतपाल निश्चल यांची दहशतवाद्यांनी केली हत्या ६५ वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गामध्ये निर्माण झाले दहशतीचे वातावरण नवा भूमी कायदा लागू झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबासाठी नागरिकत्वाचे डोमिसाइल सर्टिफिकेट हल्लीच जारी झाले होते

श्रीनगर - कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर देशातील इतर भागातील नागरिकांना काश्मीरचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र असे नागरिकत्व मिळवणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर भूमी कायद्यात झालेल्या बदलांनुसार सर्वप्रथम नागरिकत्व प्रमाणपत्र घेणाऱ्या सतपाल निश्चल यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. ६५ वर्षीय पंजाबी ज्वेलर सतपाल निश्चल यांच्या हत्येमुळे व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सतपाल निश्चल हे काश्मीरमध्ये निवासी प्रमाणपत्र घेणारे पहिले व्यक्ती होते. शेजाऱ्यांनी सांगितले की, निश्चल सरायबाला येथे सुमारे १७ वर्षे भाडेकरू म्हणून राहत होते. मात्र निश्चल यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर प्रगती केली आणि श्रीनगरमधील आलिशान अशा इंदिरानगर परिसरात घर घेतले होते. ते तिथे २५ वर्षांपासून राहत होते.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवा भूमी कायदा लागू झाल्यानंतर निश्चल आणि त्यांच्या कुटुंबासाठी नागरिकत्वाचे डोमिसाइल सर्टिफिकेट हल्लीच जारी झाले होते. निश्चल यांनी नवा भूमि कायदा अस्तित्वात आल्यानंतर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट तयार करण्याचा निर्णय घेतला होता.सूत्रांच्या म्हणण्यानुसार सतपाल निश्चल यांनी घेतलेले डोमिसाइल सर्टिफिकेट हेच त्यांच्या हत्येचे कारण ठरले आहे. काश्मीरच्या बाहेरली लोकांनी जर येथील निवासी प्रमाणपत्र घेणयाचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरसुद्धा अशीच वेळ येईल, असे सांगण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी या हत्येच्या माध्यमातून केला आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार निश्चल यांची हत्या ही दहशतवादी हल्ल्यात झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र निश्चल यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी याप्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र ही हत्या बाहेरील लोकांना घाबरवण्यासाठी करण्यात आल्याचे अनेक लोकांचे मत आहे.

 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाArticle 370कलम 370