शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 09:37 IST

अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांचा जगभरात पर्दाफाश करण्यासाठी एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे ३३ देशांमध्ये पाठवण्यात आली असून, एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा त्यात समावेश आहे. अल्जेरियात भारतीय समुदायाला संबोधित करताना ओवेसींनी पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कवर कठोर शब्दांत टीका केली.

झकीउर रहमान लखवी प्रकरणावरून पाकिस्तानचा पर्दाफाश

ओवेसींनी लष्कर-ए-तैयबाचा कमांडर झकीउर रहमान लखवीच्या प्रकरणाचा उल्लेख करत पाकिस्तानवर दुटप्पीपणा दाखवण्याचा आरोप केला. ते म्हणाले, “कोणताही देश दहशतवादाच्या आरोपाखालील व्यक्तीला तुरुंगात सजा भोगत असताना विशेष वागणूक देत नाही. मात्र, पाकिस्तानमध्ये लखवी तुरुंगात असूनही बाप बनतो, हे कायद्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन नाही का?”

ग्रे लिस्टचा प्रभाव आणि ओवेसींचा इशारा

पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF (Financial Action Task Force) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडताना ओवेसी म्हणाले की, “२०१८ साली जेव्हा पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये होता, तेव्हा भारतात दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली होती. पुन्हा तसेच केल्यास परिणामकारक फरक पडेल.”

त्यांनी दहशतवादाच्या जागतिक स्वरूपावर भाष्य करत सांगितले की, “हा केवळ दक्षिण आशियाचा प्रश्न नाही. आपण जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. त्यामुळे भारतात दहशतवाद वाढल्यास त्याचे परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होतील. जागतिक शांततेसाठी पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे.”

दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून

दहशतवादाच्या मुळाशी जात ओवेसी म्हणाले, “दहशतवाद दोन गोष्टींवर अवलंबून असतो – विचारसरणी आणि निधी. पाकिस्तानी दहशतवादी गटांची विचारसरणी दाएश आणि अल-कायदाशी मिळतीजुळती आहे. त्यांना वाटते की त्यांच्या हिंसक कृत्यांना धार्मिक आधार आहे, जे पूर्णतः चुकीचे आहे.”

ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद्यांना बसला फटका

७ मे २०२५ रोजी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्ष केंद्रित केले. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांचे १०० हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने ड्रोन व गोळीबाराच्या माध्यमातून प्रहार केला, मात्र भारताने ११ पाकिस्तानी हवाई तळांना लक्ष्य करत प्रभावी प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPakistanपाकिस्तान