शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील गांदरबलच्या जंगलात सापडला दहशतवाद्यांचा अड्डा, शस्त्रास्त्रे जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 19:48 IST

लष्कराने उघडलेल्या जोरदार आघाडीमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. दरम्यान, खोऱ्यातील गांदरबल जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे.

श्रीनगर - लष्कराने उघडलेल्या जोरदार आघाडीमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांची दाणादाण उडाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत लष्कराने 15 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान, खोऱ्यातील गांदरबल जिल्ह्यातील दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गांदरबलच्या जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाचा छडा लावत ते उद्ध्वस्त करण्यात आले आहे. तसेच त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी गांदरबलच्या जंगली भागात शोधमोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या या गुप्त ठिकाणाचा छडा लागला. त्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. तसेच या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.  

सुरक्षा दलांनी काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरामध्ये राज्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी 16 दहशतवाद्यांच्या खात्मा केला आहे.  शोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी (25 नोव्हेंबर) झालेल्या चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.  या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   

शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात जवान व दहशतवाद्यामध्ये झालेल्या चकमकीत दहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अनंतनागमध्ये खात्मा करण्यात आलेले सर्व दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा व हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांमध्ये कार्यरत असल्याचा संशय आहे. तर यातील एक दहशतवादी अजाद मलिक हा ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात सहभागी होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी