शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : कुपवाड्यात जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 10:27 IST

कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.

श्रीनगर :  जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढताहेत. सोमवारी (16 जुलै) सकाळीदेखील कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीदरम्यान जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. तसंच घटनास्थळावरुन जवानांनी एक 47 रायफल ताब्यात घेतली आहे.  यादरम्यान, दोन जवान जखमी झाले आहेत. 

यापूर्वी, 9 जुलैला जम्मू काश्मीरमधील कुपवाडात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले होते. कुपवाड्यातील हंडवाडा येथे रात्री उशिरा झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. हंडवाड्यात दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली होती. त्यानंतर तेथे तातडीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्याने गोळीबार केला, त्याला सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले. यामध्ये हा दहशतवादी मारला गेला. 

तर 11 जुलैला कुपवाडा जिल्ह्यातील कांडी जंगल क्षेत्रात करण्यात आलेल्या एन्काऊंटरमध्ये शिपाई मुकुल मीना यांना गोळी लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते. यावेळी घटनास्थळावरुन त्यांना सुखरुपरित्या बाहेर आणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

13 जुलैलाही जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गस्तीवर असलेल्या जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले होते. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला