शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:20 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामामधील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या पोलीस स्टेशनवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्लात चार पोलीस कर्मचारी जमखी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर दहशतवादी पसार झाले आहेत. घटनास्थळी पोलिसांची दुसरी तुकडी दाखल झाली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. तसेच, जखमी पोलीस कर्मचा-यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

दुसरीकडे, सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आज सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. पाकिस्ताननं 24 तासांमध्ये दुस-यांदा गोळीबार केला. जम्मूमधील आर.एस.पुरा सेक्टर, अर्निया व रामगड सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. दरम्यान, गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. गुरुवारीदेखील (18  जानेवारी) आर.एस.पुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून  30 -40 भारतीय चौक्यांना टार्गेट करण्यात येत आहे. शिवाय, पाकिस्तानी रेंजर्स भारतीय नागरिकांना निशाणा बनवत आहेत.  गुरुवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतानं एकूण 3 पाकिस्तानी सैनिकांसहीत 8 जणांचा खात्मा केला आहे. यादरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश शहीद झाले.

 

पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेशभारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत.भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले. 

 

ही युद्धजन्य स्थिती धोकादायकच आहे. जीवितहानी टाळण्यासाठी अभेद्य शिरस्त्राण आणि जाकीट असले तरी शरीराचे इतर भाग असुरक्षितच असतात. पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय हद्दीत विनाकारणगोळीबार करण्याची ही काही पहिली घटना नाही. ३ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. त्यावेळी आम्ही ताकदीने पलटवार करून बदला घेतला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर