शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 08:24 IST

शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे.

नवी दिल्ली- शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. 9 फेब्रुवारी 2013च्या दिवशीच दहशतवादी अफजल गुरू याला फाशी देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी 9 फेब्रुवारी 2013ला दहशतवादी अफझल गुरूला फाशी दिली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पठाणकोट सारखा हल्ला करण्याच्या तयारीत होती.जम्मूतल्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी फियादीन प्रशिक्षण दिलेले दहशतवाद्यांचाही जैश-ए-मोहम्मदनं वापर केला आहे. फियादीन हल्ल्यात लष्करी तळांमध्ये घुसून जास्तीत जास्त जवानांना मारण्याचं दहशतवाद्यांचं लक्ष्य असतं. त्यासाठी ते आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून स्वतःलाही उडवून देतात. परंतु गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा हल्ला टळला आहे. जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी हल्ल्यात 2 अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, 1 मेजर व 1 सुरक्षा जवानाची मुलगी, 5 महिला यांच्यासह 9 जण जखमी झाले होते. हा हल्ला 4 ते 5 अतिरेक्यांनी केला. त्यापैकी 3 जणांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. आणखी 3 दहशतवादी कॅम्पमधील निवासी भागात लपून बसले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या अतिरेकी हल्ल्यात सुभेदार मदनलाल चौधरी व सुभेदार मोहम्मद अशरफ मीर शहीद झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले.पहाटे 5च्या सुमारात काही दहशतवादी गोळीबार करीत कॅम्पमध्ये शिरले आणि तेथील अधिका-यांच्या निवासी भागात घुसले. आत शिरताना त्यांनी जवानांवर गोळीबार केला. दहशतवादी निवासी भागात घुसल्याने जवानांनी या भागाला घेरले. निवासी भागातून लोकांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात एक अधिकारी शहीद झाला आणि 5 महिला आणि एका मुलीसह 9 जण जखमी झाले. जखमींमध्ये हवालदार अब्दुल हमीद, लान्स नायक बहादूर सिंह आणि दिवंगत सुभेदार चौधरी यांच्या मुलीचा समावेश आहे. त्यामुळे जम्मूमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  कमांडो पथकातर्फे ऑपरेशन सुरू आहे. जम्मूत हाय अ‍लर्ट घोषित केला आहे. संसद हल्ल्यातील अफजल गुरुला ९ फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर 9 तारखेच्या दरम्यान जैश-ए-मोहम्मदकडून हल्ले होण्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी