शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:51 IST

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. 9 जून रोजी झालेल्या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू तर 40 जखमी झाले.

Rahul Gandhi on Terrorist Attack in Jammu : रविवारी(दि.9 जून) जम्मू काश्मीरच्या रियासी भागात माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दरशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. यात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले. याशिवाय, कठुआ आणि डोडा भागातही हल्ले झाल्यामुळे राजकारण तापले आहे. याचे कारण म्हणजे, ज्या दिवसी हा हल्ला झाला, त्या दिवशी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होता. आता यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

'पंतप्रधान जल्लोषात मग्न'राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर आपला संताप व्यक्त केला. राहुल गांधींनी म्हटले की, "अभिनंदन संदेशांना उत्तर देण्यात मग्न असलेल्या नरेंद्र मोदींनाजम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंचाळ्या ऐकू येत नाहीत."

"गेल्या 3 दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडामध्ये 3 वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत, पण पंतप्रधान अजूनही आपल्या उत्सवात मग्न आहेत. हा देश उत्तर मागतोय...भाजप सरकारमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना का पकडले जात नाही?" असा सवाल त्यांनी या पोस्टमधून केला.

पंतप्रधानांच्या मौनावर काँग्रेसने उपस्थित केला प्रश्नदुसरीकडे, काँग्रेसनेही वाढत्या दहशतवादी हल्ले आणि पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने म्हटले की, "पाकिस्तानी नेत्यांच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे वेळ आहे, पण दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करायला वेळ मिळाला नाही. मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षात राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचली आहे, निरपराध लोक भ्याड दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरत आहेत," अशी टीका काँग्रेसने केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला