शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

टेरर फंडिंग : NIAचा श्रीनगर, बारामुल्ला, हंदवाड्यातील 12 ठिकाणी छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 10:33 IST

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या आर्थिक मदत (टेरर फंडिंग) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बुधवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाड्यातील 12 ठिकाणी छापे मारले आहेत.

श्रीनगर, दि. 16 -श्रीनगर, दि. 16 - पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या आर्थिक मदत (टेरर फंडिंग) प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बुधवारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाड्यातील 12 ठिकाणी छापे मारले.  बारामुल्ला जिल्ह्यातील कुंजर परिसरात कट्टरवाद्यांच्या हुर्रियत कॉन्फरन्स संघटनेशी संबंधित असलेल्या नातेवाईकांच्या ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली आहे.  टेरर फंडिंग) प्रकरणात अनेक फुटीरतावादी नेत्यांची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) कारवाईचा फास आणखी आवळल्याचे यावरुन दिसत आहे. श्रीनगरमधील एका व्यावसायिकाशी संबंधित असलेल्या दोन ठिकाणांवरही एनआयएनं कारवाई केली आहे. 

दरम्यान, काश्मीर खो-यामध्ये हिंसक कारवाया घडवण्यासाठी तसंच दहशतावाद पसरवण्यासाठी कथित स्वरुपात पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याच्या आरोपावरुन सात काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली आहे.  नईम खान, फारूक अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, अल्ताफ अहमद शाह, शाहिद-उल-इस्लाम, अयाज अकबर, पीर सैफुल्ला व राजा मेहराजुद्दीन कलवल यांचा समावेश आहे. 

आणखी बातम्या वाचा(टेरर फंडिंग प्रकरणात गिलानीच्या दुस-या मुलाला NIAनं बजावलं समन्स)(26/11 सारखा हल्ला रोखण्यासाठी कोस्ट गार्डसाठी 32 हजार कोटींचा प्लान मंजूर)(कुरापती पाकिस्तानच्या गोळीबाराला लष्काराचं चोख प्रत्युत्तर)

एका टीव्ही चॅनेलवर प्रसारित करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये टेरर फडिंगची बाब स्वीकारल्यानंतर हुर्रियतनं नईम खानवर निलंबनाची कारवाई केली होती. या स्टिंग ऑपरेशनमध्ये नईम खाननं म्हटले होते की, काश्मीर खो-यात हिंसक कारवाया घडवण्यासाठी पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतली जाते. या गौप्यस्फोटानंतर एनआयएनं मे 2017मध्ये याप्रकरणी काही जणांची चौकशी करण्यास सुरुवात केली. 

शिवाय, एनआयएनं श्रीनगर, जम्मू, दिल्ली तसेच हरियाणामध्ये छापा टाकला होता. पाकिस्तानकडून पुरवण्यात येणारी आर्थिक रसद स्वीकारणारी व्यक्ती, मध्यस्थी करणारी व्यक्ती तसंच  मूळ व्यक्तीसंबंधी ठोस पुरावे हस्तगत केले होते. एनआयएनं आपल्या तपासाच्या प्राथमिक अहवालात पाकिस्तानातील जमात-उद-दाव व लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदला आरोपी असल्याचं नमूद केले आहे. याशिवाय, अलावा हुर्रियत, हिजबुल मुजाहिद्दीन तसंच  दुख्तरान-ए-मिल्लत यांसारख्या दहशतवादी संघटनांचा समावेश केला आहे.